शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्लेन साडी- डिझायनर ब्लाऊज, दिसाल स्टनिंग! नवरात्र- दसऱ्यासाठी साडी खरेदीच्या १० खास आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 6:06 PM

1 / 10
१. नवरात्र किंवा दसऱ्यासाठी अनेक जणी साडी खरेदी करतात. यंदाही साडी खरेदी करण्याचा विचार असेल तर सध्या प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज किंवा कॉटनची प्लेन साडी आणि त्यावर प्रिंटेड ब्लाऊज अशी जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या साड्या अंगावर नेमक्या कशा दिसतात हे जाणून घेण्यासाठी बघा बॉलीवूड अभिनेत्रींचे काही आकर्षक फोटो.
2 / 10
२. प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज हा लूक खरोखरंच खूप छान दिसतो. ही बघा त्याचीच एक झलक. अशा प्रकारचं डिझायनर ब्लाऊज असेल तर त्यात तुम्ही अधिक आकर्षक दिसू शकता.
3 / 10
३. लाल साडीतला शिल्पा शेट्टीचा हा लूकही अतिशय जबरदस्त आहे. अशा पद्धतीचं ब्लाउज असेल तर तुम्ही नवरात्रीच्या दांडियालाही अशी वेशभुषा करू शकाल. नक्कीच सगळ्यांपेक्षा वेगळ्या आणि खास दिसाल.
4 / 10
४. अभिनेत्री जेनेलिया डिसुझाचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. तिच्यासारखं हायनेक डिझायनर ब्लाऊज आणि अशी प्लेन साडी असा लूक कॅरी करता आला, तर खरोखरच बात बन जायेगी...
5 / 10
५. अभिनेत्री मृणाल ठाकूरचा हा लूकही वेगळा आहे. तिच्या ब्लाउजवर डिजिटल प्रिंट असून साडी क्रेप प्रकारातली आहे.
6 / 10
६. लोलो म्हणजेच करिश्मा कपूरही या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे. प्लेन साडी असेल आणि ब्लाऊजवर हेवी वर्क असेल तर अशा पद्धतीचं पुर्ण लांब बाह्यांचं गळाबंद ब्लाउजही छान दिसतं.
7 / 10
७. अमृता राव हिची ही साडीही त्याच पद्धतीतली. पण साडीला तिने बेल्ट लावल्याने तिचा लूक इतरांपेक्षा आणखी वेगळा दिसतो आहे. अशा पद्धतीच्या बेल्ट असणाऱ्या साड्यांचीही सध्या चांगलीच मागणी आहे.
8 / 10
८. साेनाली बेंद्रेचा हा एक खास लूक. स्लिव्हलेस ब्लाउज आणि त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज.. या साड्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर अमूक रंगाचंच ब्लाउज पाहिजे, असं काहीही नसतं. त्यामुळे एका साडीवर वेगवेगळे ब्लाउजही ट्राय करता येतात.
9 / 10
९. अभिनेत्री कोकणा सेन हिची सिल्क साडी आणि सिल्कचंच वर्क असणारं ब्लाऊज. असा लूक तुम्ही सणावाराच्या दिवसांत ऑफिसमध्येही करू शकता.
10 / 10
१०. दसऱ्याच्या दिवशी मस्त नटून- थटून जायचं असेल, तर अनुष्काप्रमाणे हेवी वर्क डिझायनर ब्लाउज, हेवी ॲक्सेसरीज आणि फूल मेकअप हा गेटअप छान दिसू शकेल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सShoppingखरेदीNavratriनवरात्री