Seven Foods For Protein : foods for protein vegetarian cheap vegetarian protein sources
प्रोटीनसाठी खूप महाग डाएट कशाला? जेवणाच्या ताटात 'हे' ७ पदार्थ असू द्या-भरपूर प्रोटीन मिळेल By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 9:06 AM1 / 8शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक असते. यासाठी हेल्दी डाएट घेण्याची गरज असते. प्रोटीन्स मसल्स बिल्डींगसाठी आश्यक असतात. मस्लस ग्रोथ आणि रेपिअरसाठी प्रोटीन्सचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे. प्रोटीन्सच्या सेवनाने मसल्स रिपेअर होण्यास मदत होते. 2 / 8रोज व्यायाम केल्यानंतरही तुमचे शरीर सुधारत नसेल तर तुमच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असू शकते. न्युट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल यांच्यामते वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित खाल्ले-पिले तर मसल्समध्ये ग्रोथ होऊ शकते. वर्कआऊटच्या ३० मिनिटांनी तुम्ही प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा (High Protein Foods) आहारात समावेश करू शकता. 3 / 8१) वर्कआऊटनंतर नारळाचे पाणी प्या. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे इलेक्ट्रोलाईट्स असतात. मसल्स ग्रोथसाठी प्रोटीन्स आवश्यक असतात.4 / 8२) व्यायामानंतर तुम्ही १ ग्लास बिटाचा ज्यूस पिऊ शकता. यात नायट्रिक ऑक्साईड असते. ज्यामुळे ऑक्सिजन परिसंचचरण वाढवून सूज कमी होते आणि मांसपेशी चांगल्या राहण्यास मदत होते.5 / 8३) ताक कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्सचा एक चांगले कॉम्बिनेशन आहे. एक हेल्दी ड्रिंक आहे. एक ग्लास ताकात जवळपास ८ ग्राम प्रोटीन्स असतात. ज्यामुळे शरीराला ताकद मिळते. 6 / 8४) व्यायामानंतर तुम्ही पनीरचा आहारात समावेश करू शकता. पनीरमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम आणि फॉस्फरेस अशी तत्व असतात. 7 / 8५) काळ्या चण्यांमध्ये व्हिटामीन्स आणि खनिजं असतात. मसल्स मजबूत बनवण्याव्यतिरिक्त हे चणे खाल्ल्याने एनिमियाचा त्रास कमी होतो. एक वाटी उकळलेल्या चण्यांमध्ये जवळपास ६ ते ७ ग्राम प्रोटीन्स असतात. 8 / 8६) सातू एक नॅच्यरल प्रोटीन शेक मानले जाते. दोन मोठे चमचे सातू पावडरमध्ये ७ ग्राम प्रोटीन्स असतात. वर्कआऊटनंतर सातूचे ड्रिंक प्यायल्याने काही दिवसातच चांगला परिणाम दिसून येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications