शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sexual Health Tips : ....म्हणून कमी वयातच घटतो पुरूषांचा स्पर्म काऊंट; चांगल्या Sex Life साठी जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 5:29 PM

1 / 10
सध्या खाण्यापिण्यातील आणि जीवनशैलीशी संबंधित चुकीच्या सवयींमुळे मानवाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुरुषांमधील वंध्यत्वाच्या समस्येसाठी आहार आणि जीवनशैलीलाही जबाबदार ठरते. वंध्यत्व (infertility) किंवा वंध्यत्वाची समस्या पूर्वी फक्त महिलांनाच दिसत होती, पण आता हळूहळू समाजात वाढलेली जागरूकता आणि गोष्टींची योग्य माहिती यामुळे यावर बोलले जात आहे.
2 / 10
वडील होणे हा कोणत्याही पुरुषासाठी आनंददायी अनुभव असतो, पण आजच्या काळात अनेक कारणांमुळे अनेक पुरुष या सुखद अनुभवापासून लांब राहतात. जीवनशैली आणि आरोग्याच्या समस्यांमुळे पुरुषांची प्रजनन क्षमता प्रभावित होते, त्यामुळे अनेक लोक पितृत्वापासून वंचित राहतात.
3 / 10
पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता आणि त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची अनेक कारणे असू शकतात. अंड्याचे फलित करण्यासाठी फक्त एक शुक्राणू आवश्यक आहे. परंतु शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास किंवा त्यांचे प्रमाण कमी झाल्यास गर्भधारणेत समस्या उद्भवू शकतात. शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या समस्येला ऑलिगोस्पर्मिया (oligospermia) असेही म्हणतात.
4 / 10
प्रायव्हेट पार्टमध्ये दुखापत किंवा आजारांमुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. याशिवाय, पाठीच्या कण्याला दुखापत, मधुमेहाचे आजार आणि शस्त्रक्रिया इत्यादींमुळे शुक्राणूंचा सामान्य प्रवाह विस्कळीत होतो.
5 / 10
शरीरात शुक्राणूंची कमतरता आनुवंशिक कारणांमुळे देखील असू शकते, याशिवाय काही गंभीर आजारांमुळे देखील असू शकते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या प्रभावित होते. अंडकोष किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोरोनरी धमनी रोगांमुळे देखील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकतात.
6 / 10
कॅन्सरसारख्या घातक आजाराचा शरीराच्या कोणत्याही एका भागावर परिणाम होतोच. पण त्यामुळे शरीराच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. या आजारामुळे आणि त्याच्या उपचारातील केमोथेरपी, शस्त्रक्रिया इत्यादींमुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
7 / 10
शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये हार्मोन्स देखील भूमिका बजावतात, हार्मोन्सच्या कमतरतेमुळे शुक्राणूंची संख्या खूप कमी होऊ शकते.
8 / 10
अति मद्य सेवन, शारीरिक व्यायामाचा अभाव, झोपेच्या समस्यांमुळे, वाढत्या वयामुळे, धूम्रपानामुळे, क्लाइनफेल्टर सिंड्रोम आणि सिस्टिक फायब्रोसिस.
9 / 10
जीवनशैली आणि आहार यासह अनेक कारणांमुळे पुरुषांची प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते. यामागे अनेक अनुवांशिक आणि वयाशी संबंधित कारणेही प्रामुख्याने कारणीभूत मानली जातात. वडील बनण्यासाठी पुरुषांना त्यांच्या शुक्राणूंच्या संख्यांची जाणीव असणे आवश्यक आहे.
10 / 10
जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वडील बनण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरला असाल तर शुक्राणूंची संख्या कमी असणे हे देखील त्यामागचे प्रमुख कारण असू शकते. शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांनी सकस आणि संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा आणि जास्त समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
टॅग्स :Sexual Healthलैंगिक आरोग्यSex Lifeलैंगिक जीवनrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप