Should you drink bittergourd juice in cold weather? 7 amazing benefits, know who and why to drink..
थंडीत कारल्याचा रस प्यावा का? ७ भन्नाट फायदे, मात्र कारल्याचा रस कुणी न पिणंच उत्तम.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 1:37 PM1 / 8साखरेत घोळलं आणि तुपात तळलं तरी कारलं हे त्याचा मुळ गुणधर्म सोडत नाही. चवीला जरी कडू असली, तरी यातील गुणधर्म बहुगुणी आहेत. थंडीच्या दिवसात कारल्याचा रस पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आपण तब्येतीची काळजी घेत आजारांपासून बचाव केला पाहिजे. त्यामुळे कारल्याचे ज्यूस प्या. यासह आजारांशी दोन हात करा. 2 / 8कारल्याचे ज्यूस बनवण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. घरच्या साहित्यात हा ज्यूस तयार होतो. त्यासाठी सर्वप्रथम कारलं स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे, थोडंस आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करा.3 / 8सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायलात तर शरीरातील विषरी पदार्थ बाहेर पडायला मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते. दिवसभरात आपल्याला ताजेतवाने वाटते.4 / 8कारल्याचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. खाज, जळजळ, सूज, फोड येणे ह्या सारख्या त्वचेच्या समस्या न होऊ देण्याचे महत्त्वपूर्ण काम कारल्याचा ज्यूस करतो.5 / 8कारल्याचा ज्यूस रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मुख्य भूमिका बजावतो. यातील मोमर्सिडीन आणि चॅराटिन हे मुख्य घटक, रक्तातील वाढती साखर कमी करण्याचं महत्त्वपूर्ण काम करतात. म्हणून रिकाम्या पोटी मधुमेहाच्या रुग्णांनी कारल्याचा ज्यूस अवश्य प्यायला हवा.6 / 8कारल्याच्या ज्यूसमध्ये डोळ्यांची दृष्टी वाढवणारा बीटा-कॅरोटिन हा घटक असतो. सोबतच मोमर्सिडीन आणि चॅराटिन रेटीना आर्टरीज मध्ये साखर जमा होण्यास प्रतिबंध करतात. म्हणून कारल्याचा ज्यूस हा फक्त डोळ्यांची दृष्टी वाढवण्यातच उपयुक्त नाही तर जास्त साखर वाढल्याने कमजोर होणारी दृष्टी सुद्धा सुधारतो. 7 / 8अपचन, गॅस, तोंडात आणि गळ्यात उष्णता निर्माण होणे, वारंवार जुलाब होणे यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर त्यावर कारल्याचा ज्यूस हा एक साधा आणि प्रभावी उपाय आहे. 8 / 8कारल्यामध्ये खूपच कमी कॅलरी असते, ज्यामुळे कॅलरी नियंत्रणात राहते आणि वजन सुद्धा वाढत नाही. त्यामुळे सकाळी नियमित कारल्याचा ज्यूस प्या. आणखी वाचा Subscribe to Notifications