शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चांदीच्या जोडव्यांची पाहा ७ ट्रेण्डी - नाजूक डिझाईन; नजरा पायांवरच खिळतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2024 6:36 PM

1 / 10
नववधूच्या मंगळसूत्रानंतर जर कोणता पहिला दागिना चढतो तर ती म्हणजे पायातील जोडवे (Jewellery). मंगळसूत्राप्रमाणेच जोडवी घालणे ही महिलेसाठी लग्न झाल्याची निशाणी मानली जाते (Women's Silver Toe Ring's). साधारण बरेच महिला चांदीचे जोडवे घालतात(Silver - Women's Toe Rings / Women's Jewellery).
2 / 10
चांदीचे जोडवे हे सौभाग्याची खुण मानली जाते. जर आपण एकच प्रकारचे जोडवे घालत असाल तर, यातही काही प्रकार पाहा. जोडव्यांची हे ट्रेण्डी प्रकार आपल्याला नक्कीच आवडतील.
3 / 10
पूर्वी जोडव्यांमध्ये केवळ ठरावीत डिझाइन्स येत होत्या. परंतु आता बदलणाऱ्या फॅशननुसार जोडव्यांच्या डिझाइन्समध्येही आपल्याला नाविन्य पाहायला मिळेल. ज्यामुळे पायाची शोभाही वाढेल.
4 / 10
सध्या सोने, चांदी, डायमंड, प्लॅटिनम इत्यादी धातूंमध्ये विविध जोडव्यांची डिझाइन्स उपलब्ध आहेत. आपण रंगीबेरंगी खड्यांचे जोडवे घालू शकता. यामुळे पाय सुंदर दिसतील.
5 / 10
जर आपल्याला जोडव्यांमध्ये घुंगरू आवडत असतील तर, त्या पद्धतीने जोडवे तयार करा. घुंगराच्या डिजाईन्सच्या जोडव्यांमुळे सर्वांच्याच नजरा पायावर जातील.
6 / 10
जोडव्यांमध्येही फ्लोरल डिझाईन देखील उपलब्ध आहे. जर आपल्याला फुलांची डिझाईन आवडत असेल तर, पायावर या प्रकारचे जोडवे शोभून दिसतील.
7 / 10
जोडव्यांसह मोत्याचं कॉम्बिनेशन बघायला खूप छान वाटतं. शिवाय पायांना नवीन लूक मिळतो.
8 / 10
आपण पायात मोत्याच्या अंगठ्याही घालू शकता. त्यावर गडद रंगाची नेलपेंट शोभून दिसेल.
9 / 10
मोरपीस फक्त पैठणीमध्ये नसून, जोडव्यांमध्येही शोभून दिसतात. मोरपीसाचं डिझाईन असणारी ही जोडवी पायात घातली तर पाय नक्कीच सुंदर दिसतील.
10 / 10
कमळ असणारं हे एक डिझाईनही पायात घातल्यावर खूप सुंदर दिसेल. या जोडव्यामुळे पायाची शोभा वाढेल.
टॅग्स :jewelleryदागिनेWomenमहिलाSocial Viralसोशल व्हायरल