शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दसरादिवाळी स्पेशल : घराची शोभा वाढविणाऱ्या पाहा सुंदर रांगोळी डिझाइन्स- पायऱ्यांवर काढा रंगबिरंगी रांगोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 2:01 PM

1 / 9
सणासुदीला आपण घरासमोर मोठी रांगोळी काढून घराची शोभा, प्रसन्नता आणि सणाचा आनंद वाढविण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी अनेक जणी घरासमोर तर छान देखणी रांगोळी काढतात. पण घरासमोर जर पायऱ्या असतील तर त्या मात्र तशाच ठेवतात.
2 / 9
यामुळे तुमची घरासमोरची रांगोळी पुर्ण वाटत नाही. त्यात काहीतरी अर्धवट झालं आहे, असं सतत वाटत राहातं. शिवाय हल्ली फ्लॅट संस्कृतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बहुतांश जणांच्या घरापर्यंत येण्यासाठी पायऱ्या असतातच. अशावेळी तुमच्या घरासमोरच्या पायऱ्याही छान सुशोभित करा. त्यावर कशी रांगोळी काढावी, हे सुचत नसेल तर या काही डिझाईन्स पाहून घ्या...
3 / 9
घरासमोरच्या पायऱ्या सुशोभित करण्यासाठी हे एक सुंदर रांगोळी डिझाईन पाहा.. तुमच्याकडे जेव्हा पुरेसा वेळ असेल तेव्हा हे डिझाईन काढा. कारण ही रांगोळी सुबक येण्यासाठी थोडा वेळ लागणारच.
4 / 9
अशाप्रकारे पायऱ्यांची एक बाजू रांगोळीचे रंग घेऊन रंगवा आणि त्यावर साचा वापरून अशी नक्षी काढा. ही रांगोळी अगदी झटपट होईल.
5 / 9
प्रत्येक पायरीची एकेक बाजू घेऊन त्यात रंग भरत बसण्याएवढा वेळ नसेल तर अशा पद्धतीचा मोठा रांगोळी साचा वापरून तुम्ही भराभर रांगोळी काढू शकता.
6 / 9
अशा पद्धतीने फुलं वापरून तुम्ही पायऱ्या सुशोभित करू शकता. यासाठी खरी किंवा आर्टिफिशियल फुलं वापरली तरी चालते.
7 / 9
दसरा- दिवाळीच्या काळात झेंडूची फुलं बाजारात भरपूर प्रमाणात येतात. त्या फुलांच्या पाकळ्या करून तुम्ही अशी रांगोळी काढू शकता.
8 / 9
हे एक सुंदर डिझाईन पाहा.. दिसायला खूप आकर्षक आणि काढायला अतिशय सोपं..
9 / 9
ही बॉर्डर रांगोळी असली तरी अशा पद्धतीचं एकेक डिझाईन तुम्ही प्रत्येक पायरीच्या कोपऱ्यावर काढू शकता.
टॅग्स :rangoliरांगोळीSocial Viralसोशल व्हायरल