Simple Marathi Makeup Look | Nauvari Saree Hairstyles
साडी नेसल्यावर शोभून दिसणाऱ्या ८ सुंदर हेअरस्टाईल, सोप्या -झटपट पण देतात रॉयल लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2024 4:26 PM1 / 10सणावाराला साडी नेसायला अनेक महिलांना आवडते (Ganesh Chaturthi 2024). आजकाल फार कमी महिला आहेत, ज्या सणाच्या दिवशी साडी नेसतात. साडी नेसली की गळ्यातलं, कानातलं, बांगड्या, पैंजण या सगळ्या ज्वेलरींचा वापर होतोच (Hairstyle). पण मुख्य म्हणजे हअरस्टाईल. साडी नेसली की हेअरस्टाईल कोणती शोभून दिसेल? (Maharashtrian hairstyle) असा प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनामध्ये येतो(Simple Marathi Makeup Look | Nauvari Saree Hairstyles). 2 / 10जर आपल्याकडे गजरा किंवा इतर हेयर अॅक्सेसरीज असतील तर, या ७ हेअरस्टाईल एकदा पाहून घ्या. विविध प्रकारच्या साड्यांवर या हेअरस्टाईल शोभून दिसतील. शिवाय आपल्याला एक नवीन लूक देखील मिळेल. 3 / 10साडी नेसल्यावर बहुतांश महिला वेणी घालतात. पण फक्त साधारण वेणी घालू नका. साइड वेणी घाला. त्यावर आर्टिफिशियल हेअर ज्वेलरी लावून डेकोरेट करा.4 / 10जर आपले केस मिडियम साईजचे असतील तर, वेणी घालू नका. आपण पुढच्या बाजूने हेअरस्टाईल करू शकता आणि मागे केस मोकळे सोडू शकता. हवं तर आपण मागच्या बाजूला गजरा लावू शकता. 5 / 10जर आपण पारंपरिक साडी नेसली असेल तर, केसांचा सुंदर बन तयार करा. त्यावर गजरा किंवा इतर हेअर ज्वेलरी लावा. यामुळे तुमचा लूक अधिक खुलून दिसेल. 6 / 10कधी कधी आपण खूपच गडबडीत असतो, आणि केसांची कोणती हेअरस्टाईल करावी हे सुचत नाही. आशावेळी आपण साइड पफ तयार करू शकता. साडीवर हा लूक देखील उठून दिसेल. 7 / 10साडीवर हाय पोनीटेल देखील शोभून दिसेल. आपण पुढच्या बाजूला छोटा पफ तयार करू शकता. या केस रचनेमुळे चेहऱ्याचा लूक बदलेल. 8 / 10जर आपली साडी डिझाईनर असेल तर, खालच्या बाजूने पोनीटेल घाला. आपण त्यावर फुलांचाही वापर करू शकता. डिझाईनर साड्यांवर सिंपल केसरचना शोभून दिसतात. 9 / 10समोरून पफ आणि मागे वन साईड वेणी ही हेअरस्टाईल डिझायनर तसेच पारंपरिक अशा दोन्ही साड्यांवर छान दिसेल.10 / 10साडीवर मॉर्डन लूक हवा असेल तर, केसांचा सिम्पल बन तयार करा. सिम्पल बनमुळेही आपल्याला सुंदर लूक मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications