1 / 7उन्हाळ्यात त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. कारण त्वचा चिपचिपित होते, टॅनिंग खूप जास्त होतं. हे सगळं कमी करण्यासाठी कोणतेही महागडे फेसपॅक वापरण्याची गरज नसते.2 / 7काही घरगुती उपायही तुमच्या त्वचेची खूप चांगली काळजी घेऊ शकतात. ते उपाय नेमके कोणते याविषयीची माहिती सौंदर्यतज्ज्ञांनी appealbridalsaloon या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.3 / 7यामधला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे कच्चं दूध त्वचेला लावून त्याने मसाज करा.. त्वचा चमकदार होईल.4 / 7थंडगार दही चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. त्वचेवरचं टॅनिंग जाऊन छान ग्लो येईल.5 / 7तिसरा उपाय म्हणजे काकडीचा किस आणि मिल्क पावडर एकत्र करून त्याचा फेसपॅक तयार करा आणि त्याने चेहऱ्याला मसाज करा. त्वचा चमकेल.6 / 7ग्रीन टी आणि योगर्ट हे दोन्ही एकत्र करून चेहऱ्याला मसाज केल्यासही त्वचेमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल.7 / 7कोरफडीचा ताजा गर आणि केळी हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला लावा. हा लेप चेहऱ्यावर १० मिनिटे ठेवा. टॅनिंग कमी होईल आणि त्वचेला छान थंडावा मिळून ती माॅईश्चराईज होईल.