शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही घेत आहात ते पेरू किडके तर नाही ना? पिकलेले गोड पेरू खरेदी करण्यासाठी ३ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2024 9:17 AM

1 / 6
सध्या बाजारात भरपूर प्रमाणात पेरू आलेले आहेत. त्यामुळे ते घेण्याचा आणि खाण्याचा मोह होणं अगदी साहजिक आहे.
2 / 6
पेरुमधून फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी पेरु उपयुक्त ठरतो. इम्युनिटी वाढविण्यासाठी, शरीरातलं बॅड कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पेरु खाणं अतिशय फायदेशीर ठरतं.
3 / 6
आपण बाजारातून जेव्हा पेरू घेतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की ते पेरू बाहेरून दिसायला तर चांगले दिसतात. पण आतून मात्र किडके असतात. काही पेरुंमध्ये तर अळ्या असतात. म्हणूनच पेरू घेताना ते चांगले निघावेत यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या ते पाहा.
4 / 6
पेरू घेताना ज्याचा रंग एकसमान असतो, असा पेरू घ्यावा. कुठे पिवळट तर कुठे हिरवट असलेला पेरू घेणं टाळा.
5 / 6
पेरूचं देठ दाबून पाहावं. जर पेरू देठाकडे मऊ लागला तर तो घेऊ नये
6 / 6
खूप जास्त पिकलेले पिवळट रंगाचे पेरू घेऊ नका. थोडा हिरवट पेरू निवडा. कारण पिवळे दिसणारे पेरू खूप जास्त पिकलेले असतात आणि पिकलेल्या पेरुंमध्येच जास्त अळ्या निघतात.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलShoppingखरेदीfruitsफळे