शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोजच्या कामांमुळे त्वचेची काळजी घ्यायला वेळच नसतो? विकेंडला करा ५ गोष्टी, सौंदर्य खुलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2024 9:23 AM

1 / 7
बऱ्याच जणी त्यांच्या रोजच्या कामांमध्येच एवढ्या अडकलेल्या असतात की स्वत:कडे, स्वत:च्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो.
2 / 7
पण त्वचेची योग्य ती काळजी घेतली गेली नाही, तर ती लवकर थकल्यासारखी दिसते. त्वचेवर सुरकुत्या येणे, टॅनिंग वाढणे, ड्राय पडणे अशा तक्रारी जाणवू लागतात. म्हणूनच अगदी रोजच्या रोज त्वचेसाठी काही करणं होत नसलं तरी आठवड्यातून एकदा सुटीच्या दिवशी हे काही उपाय करा. जेणेकरून तुमच्या त्वचेचं सौंदर्य नेहमीच टिकून राहील.
3 / 7
आपण दररोज खूप गडबडीत आंघोळ करतो. पण सुटीच्या दिवशी जरा निवांत आंघोळ करा आणि संपूर्ण शरीर व्यवस्थित लोफा वापरून स्वच्छ करा.
4 / 7
यानंतर त्वचेवर कोणतंही स्क्रब लावून त्वचेला मसाज करा. यामुळे डेड स्किन, त्वचेवरचं टॅनिंग निघून जाईल. विकतचं स्क्रब नसेल तर डाळीचं पीठ, ओटमील, दही- साखर- कॉफी पावडर असे घरगुती स्क्रब वापरले तरी चालेल.
5 / 7
स्क्रबिंग झाल्यानंतर चेहऱ्याला कोणता ना कोणता मास्क नक्की लावा. विकतचे मास्क नसतील तर मुलतानी माती, चंदन यासारखा घरगुती मास्क लावला तरी चालेल. त्वचेला आठवड्यातून एकदा मास्क लावल्याने तिच्यातला घट्टपणा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे त्वचा लवकर सुरकुतत नाही.
6 / 7
मास्क धुवून टाकल्यानंतर टोनर लावा. टोनर ऐवजी गुलाबजल लावलं तरी चालेल. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
7 / 7
सगळ्यात शेवटी तुमचं नेहमीचं मॉईश्चरायझर लावा. आठवड्यातून एक दिवस त्वचेसाठी एवढं केलं तर तुमची त्वचा नेहमीच खुललेली राहील.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी