Small easy rangoli designs Daily Tipkyanchi Rangoli
ठिपक्यांची रांगोळी काढताच येत नाही? फक्त ३ ठिपके आणि १० मिनिटांत काढा सुंदर रांगोळी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 5:43 PM1 / 9सणवार (Festival) कोणताही असो, दारात रांगोळी असली की, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते (Rangoli Design). गणेश चतुर्थीनंतर एका मागोमाग एक सणवार येतात. नवरात्रीनंतर (Navratri) लगेच दसरा (Dasara) आणि दिवाळी (Diwali) येईल. दसरा - दिवाळीला आपण न चुकता दारात रांगोळी काढतो(Small easy rangoli designs Daily Tipkyanchi Rangoli).2 / 9रांगोळीचे देखील अनेक प्रकार आहेत. काही जण फुलांचीही रांगोळी काढतात. काहींना रांगोळीचे डिझाईन काढायला जमत नाही. तर, काहींना चिमटीमध्येही रांगोळी पकडता येत नाही. 3 / 9जर आपल्याला सिंपल पण आकर्षक आणि सोप्या डिझाईनच्या रांगोळी काढायच्या असतील तर, ठिपक्यांची रांगोळी काढून पाहा. २-३ - २ ठिपके काढून, रांगोळीने जोडून आपण सुंदर फुल काढू शकता. त्यात आकर्षक रंग भरा. सुंदर रांगोळी तयार होईल. 4 / 9जर थोडी मोठी रांगोळी काढायची असेल तर, आडवे-उभे १२-१२ ठिपके सगळ्यात आधी काढून घ्या. नंतर लाईन्स जोडून रांगोळी तयार करा. ही रांगोळी रंग भरल्यानंतर फारच आकर्ष दिसेल.5 / 9१५ - ८ ठिपके काढूनही आपण सुंदर आणि पारंपारिक रांगोळी काढू शकता. ठिपक्यांचे लाईन्स जोडून आपण फुलं काढू शकता. फुलांमध्ये आवडीचे रंग भरा. यामुळे रांगोळी सुरेख दिसेल. 6 / 9५ ठिपक्यांची रांगोळी आपण देव्हारा किंवा बाल्कनीमध्येही काढू शकता. लाईन्स जोडून दिवे काढा. त्यात रंग भरा. रांगोळी सुंदर दिसेल. 7 / 9४-७ असे ठिपके काढून तुम्ही आकर्षक रांगोळी काढू शकता. षटकोण आकारामध्ये तयार झालेली रांगोळीमध्ये आपण आवडीचे रंग भरू शकता. 8 / 9१३ ते ७ ठिपके काढून ही रांगोळीची डिजाईन तुम्हाला काढता येईल. फुलांचीही डिझाईन सुंदर आणि पारंपारिक दिसत आहे. 9 / 9जर आपल्याला मोठी रांगोळी काढायला जमत नसेल, शिवाय डिझाईनही जमत नसेल तर, २० - २० चे ठिपके काढून रांगोळी काढा. आणखी वाचा Subscribe to Notifications