शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाळ्यात आजारपण टाळण्यासाठी किचनमधल्या ५ गोष्टींची काळजी घ्या, बघा स्मार्ट किचन टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2024 18:19 IST

1 / 7
पावसाळ्यात अनेक वेगवेगळे साथीचे आजार डोकं वर काढत असतात. त्यामुळे जर घरात कोणी आजारी पडलं तर त्या दुखण्याखुपण्यांमुळे सुखद वाटणारा पावसाळाही अगदी कंटाळवाणा होऊन जातो.
2 / 7
म्हणूनच पावसाळ्यात स्वत:सकट घरातल्या सगळ्यांचं आरोग्य जपायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्या स्वयंपाक घरातल्या काही गोष्टी तपासून घ्या...
3 / 7
यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या किचनमधले एक्झॉस्ट पंखे आणि चिमनी स्वच्छ करून ठेवा. पावसाळ्यात पदार्थ तळणे, शिजवणे, भाजणे या प्रक्रियांमुळे स्वयंपाक घर नेहमीपेक्षा जरा जास्तच कोंदट होते. त्यामुळे घरातला हा कोंदटपणा, दमटपणा बाहेर काढून टाकण्यासाठी एक्झॉस्ट पंखे व्यवस्थित हवे. यामुळे घर स्वच्छ, फ्रेश वाटेल.
4 / 7
पावसाळ्याच्या दिवसांत वेगवेगळे अन्नपदार्थ सादळून जातात. ओलसर होतात. त्यामुळे या दिवसांत पदार्थ साठवून ठेवण्यासाठी एअरटाईट जार किंवा बरण्या पाहिजेत. अनेकदा या दिवसांत त्या पदार्थांवर बुरशी येते आणि आपल्या ती लक्षातही येत नाही. असे पदार्थ खाल्ल्याने जुलाब, उलट्या असा त्रास होऊ शकतो.
5 / 7
पावसाळ्यात सर्दी, खोकला असा त्रास खूप जणांना वारंवार होतो. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. म्हणूनच या आजारांची लक्षणं दिसताच दालचिनी, लवंग, सुंठ, हळद असे पदार्थ टाकून काढा द्यावा. हे पदार्थ तुमच्या घरात आणून ठेवा आणि वेळीच त्यांचा वापर करा.
6 / 7
पावसाळ्याच्या दिवसांत सिंक, सिंकच्या खालचा पाईप स्वच्छ ठेवा. यामुळे घरात चिलटं, डास, माशा, झुरळं होणार नाहीत.
7 / 7
या दिवसांत तुमच्या घरात हंगामी फळं आणि भाज्या आणून ठेवा आणि ती नियमितपणे घरातल्या सगळ्या मंडळींना खायला द्या. कारण त्या फळं आणि भाज्यांमधून मिळणारे पौष्टिक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMonsoon and Diseasesपावसाळा आणि पावसाळी आजारपण