शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोणाला मिळाला बंगला तर कोणाला मिळाली गाडी- बघा मुलांना महागडे गिफ्ट्स देणारे सेलिब्रिटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2024 09:10 IST

1 / 5
बी टाऊनमधले असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी त्यांच्या मुलांना खूप महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. आता नुकतंच चर्चेत असणारं एक महागडं गिफ्ट म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी त्यांच्या मुलीच्या म्हणजेच राहा कपूरच्या नावावर केलेला त्यांचा २५० कोटींचा नवा बंगला.. असे आपल्या मुलांना महागडे गिफ्ट्स देणारे आणखी कोण कोण बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत ते पाहा...
2 / 5
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्यासाठी दुबईमध्ये ५४ कोटींचा एक अलिशान बंगला घेतला आहे. इंडिया टुडे यांनी दिलेल्या वृत्तानुसार हा बंगला घेतला त्यावेळी आराध्या फक्त १ वर्षाची होती.
3 / 5
financialexpress यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्या मुलीसाठी म्हणजेच अदिरा चोप्रा हिच्यासाठी मुंबईमध्ये दोन अलिशान बंगले घेतले आहेत.
4 / 5
मुलांना महागडे गिफ्ट्स देण्यात बेबो आणि सैफ अली खानसुद्धा मागे नाहीत. त्यांनी तैमुरला तो अवघ्या १ वर्षांचा असताना १.१४ कोटी रुपयांची महागडी गाडी गिफ्ट केली होती.
5 / 5
शाहरुख खाननेही आर्यन आणि सुहाना या त्याच्या मुलांना ७० लाखांची ऑडी गिफ्ट केली होती.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीRanbir Kapoorरणबीर कपूरAlia Bhatआलिया भटAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनAbhishek Bacchanअभिषेक बच्चनSaif Ali Khanसैफ अली खान Kareena Kapoorकरिना कपूर