शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिसाल फॅशन क्विन! पाहा उन्हाळा स्पेशल कपडे-सॅण्डल आणि बॅगचे पर्याय, उन्हाळ्यातली डेट ठरेल स्पेशल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 17:41 IST

1 / 8
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्याला जीवावर येते. परंतु, घरात बसून देखील वैताग येतो. अशावेळी मित्र-मैत्रिणीसोबत किंवा आपल्या पार्टनरसोबत बाहेर फिरायचा प्लान केला तर कोणते कपडे घालायला हवे असा प्रश्न पडतो. (Women’s fashion tips for summer)
2 / 8
उन्हाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त प्रमाणात असते तसेच तापमान देखील जास्त असते त्यामुळे आपल्याला अधिक प्रमाणात गरम होते. अशावेळी कोणत्या प्रकारचे कपडे घालावा हे आपल्याला समजत नाही. पाहूया कपडे निवडण्याची सोपी ट्रिक (Casual travel fashion for women)
3 / 8
फ्लोरल प्रिंटेड कपडे उन्हाळ्यात आपला लूक अधिक सुंदर करतात. यामध्ये शिफॉनचा किंवा कॉटन फॅब्रिकमध्ये हलक्या फुलांचा ड्रेस निवडा. यावर स्ट्रॅपी सँडल आणि शोभेल अशी कमी ज्वेलरी वापरा.
4 / 8
आपल्या सुंदर आणि ट्रेंडी कपडे घालायचे असेल तर रॅप ड्रेस आपल्यासाठी परफेक्ट आहे. हा आपण आपल्या फिगरनुसार निवडू शकतो. उन्हाळ्यात घराबाहेर जात असाल तर वापरता येईल. यामध्ये पेस्टल किंवा सॉफ्ट टोन निवडता येईल. याच्यासोबत क्लच आणि कॅट- आय सनग्लासेस ठेवा.
5 / 8
समर डेट आउटफिटसाठी आपण क्रॉप टॉप आणि स्कर्ट अतिशय ट्रेंडी कपडे आहे. यामुळे आपला लूक खूप छान आणि स्टायलिश दिसेल. यासोबत आपण कॅप आणि पांढरे स्नीकर्स कॅरी करु शकतो.
6 / 8
आपल्याला वेस्टर्न लूक ट्राय करायचा असेल तर शॉर्ट ड्रेससोबत डेनिम जॅकेट ट्राय करु शकतो. हा लूक संध्याकाळच्या वेळी चांगला आहे. यामध्ये स्टायलिश दिसाल तसेच हलक्या थंड वाऱ्यातही आरामदायी वाटेल.
7 / 8
उन्हाळ्यात लाईट रंगाचे कपडे वापरा. यामध्ये मॅक्सी ड्रेस खूप सुंदर आणि आरामदायी असेल. जर आपल्याला डेटवर जायचे असेल तर हा सिंपल लूक छान आहे. यावर बेल्ट आणि साध्या सॅण्डल घालून लूकमध्ये आणखी भर घालता येईल.
8 / 8
उन्हाळ्यात हलके आणि कमीत कमी ज्वेलरी घाला. यामध्ये लहान हूप इअररिंग्ज, नाजूक पेंडेंट किंवा चेन आणि पातळ ब्रेसलेट वापरा. आपल्या कपड्यांना शोभतील अशाप्रकारच्य़ा गोष्टी निवडा.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिला