शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाळयात फॅशनेबल आणि ' कूल' ठेवणारे कपडे, उकडून बटाटा होऊ नये म्हणून पर्याय, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 1:27 PM

1 / 8
उन्हाळ्याच्या दिवसांत पारा वाढलेला असल्याने सतत घामाघूम व्हायला होतं. अशावेळी अंगावर घट्ट किंवा जाडसर कपडे असतली तर जीव आणखी नको होतो. कडक उन्हात घामाघूम होऊन ऑफीसला जायचं आणि तरी फॅशनेबल दिसायचं यासाठी काही खास टिप्स (Summer Fashion Tips)...
2 / 8
सुती आणि घाम टिपून घेणारे कपडे हवे असतील तर कॉटनचे कुर्ते आणि त्यावप पँट, लेगिन्स किंवा पलाझो हे उत्तम पर्याय असतात. या कपड्यात घाम आला तरी अनइझी होत नाही.
3 / 8
तुम्हाला शॉर्ट ड्रेस घालायला आवडत असेल तर सुती कापडात किंवा अगदी हलक्या कापडाचे ड्रेस मस्त दिसतात. गडद रंगाचे, फ्लोरल प्रिंट असलेले किंवा वेगवेगळ्या फॅशनचे शॉर्ट ड्रेस घातले की फार उकडतही नाही.
4 / 8
उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे आऊटींगला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर जंपसूट हा चांगला पर्याय असतो. हा जंपसूट एकसलग असला तरी मोकळाढाकळा असल्याने अजिबात उकडत नाही.
5 / 8
शॉर्ट ड्रेस वापरत नसाल तर लाँग गाऊनमध्येही बरेच पर्याय उपलब्ध असतात. यामध्ये पायही झाकले जातात आणि तरी मोकळेढाकळे वाटते. त्यामुळे अगदी ऑफीसला किंवा बाहेर जातानाही आपण अशाप्रकारचे अनारकली स्टाईल वन पीस घेऊ शकतो.
6 / 8
लहानपणी आपण सगळ्यांनीच स्कर्ट वापरलेला असतो. पण मोठे झाल्यावरही स्कर्ट टॉपची फॅशन छान दिसते. अगदी ऑफीसला किंवा बाहेर जाताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट वापरु शकतो. यात जास्त गरमही होत नाही.
7 / 8
फॉर्मल शर्ट आणि पँट हाही उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय असतो. या पँट कापडाच्या असल्याने जीन्सपेक्षा त्या जास्त कम्फर्टेबल असतात.
8 / 8
पलाझो हा उन्हाळ्यात वापरण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय आहे. सध्या वेगवेगळ्या प्रिंटमध्ये, रंगांमध्ये या पलाझो मिळतात. टॉप, टि शर्ट, फॉर्मल शर्ट अशा कशावरही त्या मस्त दिसतात आणि मोकळ्याढाकळ्या असतात.
टॅग्स :fashionफॅशनSummer Specialसमर स्पेशलBeauty Tipsब्यूटी टिप्स