शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चक्कू छुरिया तेज करा लो, ते ही घरच्याघरी ! ८ ट्रिक्स- सुरी होईल धारदार तेज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 7:13 PM

1 / 9
किचनमधील चाकू, सुरीचा वापर रोज होत असल्यामुळे कालांतराने त्याची धार बोथट (Tricks To Sharpen Kitchen Knife With Waste Products At Home) होऊन जाते. सूरी किंवा चाकूची धार बोथट झाल्यावर त्याने नीट कापता किंवा चिरता येत नाही. सूरी, चाकू जितके धारदार असतात तितकेच स्वयंपाक, घरातील इतर कामे पटापट उरकता येतात. चाकू, सूरी यांना योग्य प्रमाणात धार नसली की अशा चाकू, सुरीने पदार्थ कापताना फार वेळ जातो. अशावेळी घरच्याघरी चाकू, सुऱ्यांना धार काढण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात(The best way to sharpen a kitchen knife).
2 / 9
चाकू, सुरीला गॅसच्या मंद आचेवर १० ते १५ मिनिटांसाठी गरम करुन घ्यावे. त्यानंतर सिरॅमिक कप उलटा ठेवून त्याच्या मागील पृष्ठभागाच्या कडांवर ही गरम सूरी ५ ते ६ वेळा घासून घ्यावी. यामुळे चाकू - सुरीला पटकन धार काढता येते.
3 / 9
पाटा वरवंट्याचा वापर करून तुम्ही सुरीला धार काढू शकता. यासाठी पाटा वरवंटा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सुरीच्या दोन्ही बाजू व्यवस्थित त्यावर घासा. यामुळे सुरीला चांगली धार येईल.
4 / 9
शार्पनिंग स्टोन अर्थात धार काढायचा दगड आजकाल बाजारांत कुठल्याही दुकानांत सहज विकत मिळतो. आपण या शार्पनिंग स्टोनची मदत घेऊन देखील घरच्या घरी झटपट सुरीला धारदार करु शकता.
5 / 9
नखांना शेप देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नेल फॉईलचा वापर करुन आपण चाकू - सुरीला धार काढू शकतो. यासाठी नेल फॉईल एका सपाट पृष्ठ भागावर स्थिर ठेवा. त्यानंतर या नेल फॉईलच्या खडबडीत भागांवर सूरी आडवी ठेवून दोन्ही बाजुंनी घासून घ्यावी. यामुळे चाकू - सुरीला लगेच धार काढता येते.
6 / 9
घरात जर कोणत्याही वस्तूंच्या पॅकिंगचा कार्डबोर्ड उरला असेल तर या कार्डबोर्डचा वापर करुन आपण सुरीला धार काढू शकता. यासाठी कार्डबोर्ड घेऊन त्याच्या कडेवर घासून घ्यावा. यामुळे बोथट झालेल्या चाकू - सुरीला धार काढता येऊ शकते.
7 / 9
अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या अनेक शीट्स एकत्रित करुन त्याची एक जाडसर शीट किंवा बॉल तयार करून घ्यावा. आता हा बॉल हातात घेऊन चाकूला धार काढायची त्या भागावर घासावा. किंवा अनेक जाडसर शीट्स सुरीने कापण्याचा प्रयत्न करावा. यामुळे अ‍ॅल्युमिनियम फॉईल आणि सूरी यात घर्षण होऊन चाकू - सुरीला धार येते.
8 / 9
सॅण्ड पेपरच्या खरखरीत पृष्ठभागावर चाकू - सुऱ्या घासून घ्याव्यात, यामुळे चाकू - सुरीची बोथट झालेली धार लगेच परत येते.
9 / 9
चाकू - सुऱ्यांना धार काढण्यासाठी आपण लेदर बेल्टचा वापर करु शकतो. यासाठी लेदर बेल्टच्या खरखरीत पृष्ठभागावर बोथट झालेल्या चाकू - सुऱ्या घासल्यास त्यांना पटकन धार येते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलkitchen tipsकिचन टिप्स