शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ड्रीमगर्ल कधी म्हातारी होत नाही! सुपरस्टार असूनही केली प्रेमासाठी ' मोठी ' तडजोड, हेमा मालिनी म्हणते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 11:05 AM

1 / 9
बॉलीवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी, आजही आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या अभिनयाची जादू आजतागायत प्रेक्षकांवरून उतरलेली नाही. त्यांचं सौंदर्य, त्यांचं हसणं, त्यांचं अदाकारीने नृत्य करणं हे एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. आज त्यांचा ७५ वा वाढदिवस. अभिनेत्री ते राजकारणी त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. या वाढदिवसानिमित्त ते म्हणतात, '७५ वा वाढदिवस स्पेशल आहे. कारण हे दरवर्षी येत नाही.' आज आपण हेमा मालिनीबद्दल अशा काही रंजक किस्से जाणून घेणार आहोत. जे बऱ्याच कमी लोकांना ठाऊक आहेत(The original dreamgirl: Hema Malini).
2 / 9
हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी तामिळनाडूच्या अम्मनकुडी येथे झाला. त्या बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असून, त्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या होत्या. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्री गणेशा 'सपनो का सौदागर' या चित्रपटातून केला. पण त्यापूर्वी १९६१ मध्ये तामिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती.
3 / 9
अकरावीत असतानापासूनच त्यांना चित्रपटासाठी ऑफर्स येऊ लागल्या होत्या. हेमा मालिनी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले. यासह त्यांना अनेक पुरुस्काराने सन्मानितही करण्यात आले.
4 / 9
हेमा मालिनी यांचा चाहतावर्ग तर मोठाच आहे, पण बॉलिवूड स्टार्सनाही त्यांचे वेड लागले होते. संजीव कुमार आणि जितेंद्र यांनी हेमा मालिनी यांना लग्नासाठी मागणी घातली होती. जितेंद्रसोबत हेमा यांचे लग्न होणारच होते, पण ते काही कारणास्तव होऊ शकले नाही.
5 / 9
हेमा-धर्मेंद्र यांची लव्ह स्टोरी खूप चर्चेत राहिली. दोघांची भेट कशी झाली? हा प्रश्न प्रत्येक चाहत्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. हेमा आणि धर्मेद्र यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झाली. त्यावेळी हेमा या पहिल्या नजरेतच धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे धर्मेंद्रसोबतही असेच काहीसं घडले. त्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा यांनी एकत्र चित्रपट करायला सुरुवात केली.
6 / 9
असेही म्हटले जाते की, हेमा मालिनी यांच्यासोबत अधिक वेळ रोमान्स करता यावा, यासाठी शूटिंगदरम्यान धर्मेंद्र कॅमेरापर्सनला लांब सीन आणि रिटेक घेण्यासाठी लाचेच्या स्वरुपात पैसे देत असत. यादरम्यान त्यांची जवळीक खूप वाढत गेली, व दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले.
7 / 9
धर्मेंद्र हे आधीच विवाहित असल्यामुळे हेमा यांच्यासोबत लग्न करणे इतके सोपे नव्हते. पहिल्या पत्नीने धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यास नकार दिला. त्यामुळे लग्न करण्यासाठी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारुन धर्मेंद्र यांचे नाव बदलून दिलावर खान आणि हेमा यांचे नाव आयेशा झाले. २१ ऑगस्ट १९७९ रोजी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या दोघांनीही निकाह केला. त्यांना दोन लेकी असून, दोघीही अभिनेत्री आहेत.
8 / 9
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना हेमा म्हणतात, 'इतके वर्ष मी कामात खूप व्यस्त होते, की मला वेळ कुठे गेला हे कळलेच नाही. आज मी ७५ वर्षांची झाली, यावर माझा स्वतःचा विश्वास बसत नाही. पण वय हा फक्त एक आकडा आहे. तुम्ही स्वतःची कशी काळजी घेता यावर सगळं अवलंबून असते. मला जे काम मिळते ते मी करते, माझ्या मुलांसोबत आणि नातवंडांसह वेळ घालवते. आयुष्य खूप सुंदर आहे, याचा आनंद घ्या.'
9 / 9
ती पुढे म्हणते, 'माझा नवरा धर्मेंद्र देखील अमेरिकेहून परतला आहे. तो माझ्या वाढदिवसासाठी इथे आला आहे. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याने मला दिलेला सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे त्याने माझ्यासोबत वेळ घालवणे.'
टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनीbollywoodबॉलिवूडDharmendraधमेंद्र