साजूक तुपाला वास लागू नये म्हणून ७ टिप्स, तूप महिनोंमहिने राहील सुगंधी आणि रवाळ... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 5:52 PM
1 / 8 'तूप' हे रोजच्या रोज स्वयंपाक करण्यासाठी लागते म्हणून ते मोठ्या प्रमाणांत पुरवठ्याला येईल असे साठवले जाते. तूप तयार करुन झाल्यानंतर आपण ते एका मोठ्या काचेच्या स्वच्छ बरणीत स्टोअर (The Proper Way of Storing Ghee 7 Ghee Storage Tips) करुन ठेवतो. परंतु काहीवेळा आपला ओला हात लागून किंवा इतर काही कारणांमुळे हे तूप खराब होते. तूप व्यवस्थित साठवून ठेवले नाही तर त्याला बुरशी लागते. असे खराब झालेले तूप फेकून द्यावे लागते. तूप तयार करुन झाल्यानंतर ते खराब होऊ नये यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात. 2 / 8 १. जर आपल्याला अधिक काळ तूप टिकवायचे असेल तर तूप प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्यापेक्षा स्टीलच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा. यामुळे तुपाचा स्वाद आणि रंग दोन्ही खराब होणार नाही. 3 / 8 २. तूप हे नेहमी झाकूनच ठेवायला हवे. जर तुपाला हवा लागली किंवा यामध्ये पाणी गेले तर त्याचा स्वाद लवकर खराब होतो आणि तूप टिकतही नाही. 4 / 8 ३. बऱ्याच घरांमध्ये तूप हे फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्यात येतं. पण यामुळे तूप अधिक घट्ट बनते. त्यामुळे जेव्हा तूप खायचे असेल तेव्हा ते बरेचजण पुन्हा पुन्हा गरम करून घेतात, जे अजिबात योग्य नाही. तुपाचा डबा बाहेरच ठेवा. ज्यामुळे त्याचा मूळ स्वाद आणि नैसर्गिक रवाळपणा टिकून राहतो. 5 / 8 ४. तूप कढवताना त्यात चिमूटभर मीठ आणि साखर घालावी यामुळे तूप रवाळ बनून दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. यासोबतच विड्याचे पान देखील आपण टाकू शकतो. कारण विड्याच्या पानात कॅल्शियम असते आणि तुपाच्या कणांना मोठे होण्यास मदत होते आणि तूप रवाळ बनते. तुपात २ ते ३ लवंगाही घालतात म्हणजे तुपाला चांगला सुवास येतो. 6 / 8 ५. जेव्हा आपण लोणी काढतो किंवा तूप बनवण्यासाठी साय जमा करुन ठेवतो, तेव्हा ती साय आंबट होऊ देऊ नका. यामुळे तूप व्यवस्थित बनत नाही व दीर्घकाळ न टिकता लवकर खराब होते. 7 / 8 ६. जर आपण तूप फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवणार असाल तर, ज्यावेळी खायचे आहे त्याआधी एक तास आधी तुपाचा डबा बाहेर काढून ठेवावा. जेणेकरून त्याचा घट्टपणा कमी होईल. सतत तूप गरम करणे टाळावे यामुळे ते लवकर खराब होऊ शकते. 8 / 8 ७. तूप नेहमी हवेशीर आणि थेट सूर्यप्रकाश पोहोचणार नाही अशा हवा खेळती राहील अशा ठिकाणी स्टोअर करुन ठेवावे, जेणेकरुन ते खराब न होता वर्षानुवर्षे चांगले टिकून राहते. आणखी वाचा