1 / 10लोकप्रिय बॉलीवूड गायिका श्रेया घोषाल तिच्या सुंदर व मधुर आवाजाने मागच्या दोन दशकांपासून अनेकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. (Shreya Ghoshal’s Best Songs of All Time)2 / 10तिने लहान वयातच संगीत शिकायला सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी 'सा रे गा मा' या रिॲलिटी शो मधून आपले नाव कमावले.(Bollywood & Marathi Songs Shreya Ghoshal’s Voice)3 / 10श्रेयाच्या आवाजातील 'सुन रहा है' हे गाणे थेट हृदयाला भिडणारे आहे. तिच्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. 4 / 10'दीवानी मस्तानी' हे गाणं बाजीराव मस्तानी मधील असून जितके सुंदर चित्रित केले आहे. तितकेच ते गायले देखील आहे. 5 / 10'पिया ओ रे पिया' तेरे नाल लव्ह हो गया आतिफ आणि श्रेया यांच्या सुमधूर आवाजाने हे गाणे खूप लोकप्रिय झाले. 6 / 10मेरे ढोलना (भूल भूलैया) हे सर्वात कठीण क्लासिक गाण्यांपैकी एक असून श्रेयाने तिच्या आवाजासह गाण्याला पूर्ण न्याय दिला. 7 / 10इतकेच नाही तर श्रेयाने हिंदीसह मराठी गाणी देखील गायली आहेत. त्यात 'जोगवा', 'नटरंग', 'कट्यार काळजात घुसली' यांसारख्या गाण्यांनी चाहत्यांची मन जिंकली. 8 / 10तिच्या आवाजात असणारी सोज्वळता, ताकद आणि सुंदर असे लय या तिन्ही गोष्टी मराठी गाण्यांमध्ये ऐकायला मिळतात. 9 / 10श्रेयाने २०० हून अधिक चित्रपटांच्या गाण्यांना आवाज दिला आहे. अमेरिकेच्या 'ओहायो' राज्यात तिच्या नावाने 'श्रेया घोषाल दिवस' म्हणून साजरा केला जातो. 10 / 10सुन राहा है, डोला रे, झल्ला वाल्लाह, तुझ में रब दिखता है... अशी सुंदर गाणी हिट ठरली. समधुर आवाजासह तिच्या इंडो-वेस्टर्न आउटफिट देखील चाहत्यांना भूरळ पाडतो. तिच्या फॅशन सेन्समुळे ती एक स्टाइल आयकॉन बनते.