शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तिशीनंतर महिलांच्या शरीरात होणारे ५ बदल देतात भविष्यातील आजारांचा इशारा, तब्येत बिघडण्यापूर्वी व्हा सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2022 8:10 AM

1 / 7
१. तिशी आली की गध्धे पंचविशी सरली म्हणून प्रत्येकाने थोडंसं सावध होण्याची गरज असतेच.. या वयात मॅच्युरीटी वाढलेली असते. करिअरमध्ये एका लेव्हलपर्यंत आपण गेलेलो असतो. वैयक्तिक आयुष्यातही अनेक बदल होत असतात. या सगळ्या बदलांकडे बघताना, ते समजून घेताना, शरीरामध्ये काय बदलत चाललंय, याकडे दुर्लक्ष करू नका.
2 / 7
२. कारण तिशीनंतर तुमच्या शरीरात काही लहान- लहान बदल होऊ लागतात. सुरुवातीला सौम्य असतात, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. ते बदल नेमके कशामुळे होतात, त्यांचा शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो, याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. निकिता कोहली यांनी एचटी लाईफस्टाईल यांच्याशी बोलताना दिलेली ही माहिती.
3 / 7
३. पोटाच्या खालच्या भागात चरबी वाढू लागली तर त्यांना visceral fat म्हणून ओळखलं जातं. चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम क्रियेत झालेला बदल यातून दिसून येतो. तसेच हार्मोन्सच्या असंतुलनामुळेही असा त्रास होऊ शकतो. यावरून आहारात काही पौष्टिक बदल करायला हवेत, हे दिसून येतं.
4 / 7
४. केसगळती- तिशीनंतर अचानक असा त्रास सुरु झाला असेल तर तुमच्या आहाराकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. काम किंवा ताण या नादात तुम्ही प्रोटीन्स, फॅटी ॲसिड, झिंक यासारखे पौष्टिक पदार्थ खाण्यास विसरत आहात, हे यावरून लक्षात येतं.
5 / 7
५. साधारण या वयात बाळाचा विचार केला जातोच. जर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत असाल, पण प्रेग्नन्सी राहण्यात अडचण येत असेल तर जास्त वेळ न दवडता काही महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करून घ्या. कारण मधुमेह, बीपी, वाढलेला ताण किंवा वाढलेलं वजन, थायरॉईड या आजारांमुळेही प्रेग्नन्सी राहण्यात अडचणी येऊ शकतात.
6 / 7
६. एण्डोमट्रीओसिस, फायब्रॉईडच्या गाठी असे त्रास या काळात निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पाळी येण्यात काही बदल होऊ शकतात. प्रत्येकवेळी पाळी अनियमित झाल्यावर हेच कारण असेल असे नाही. पण तरीही एकदा पाळीचे चक्र बदलल्यास डॉक्टरांकडून या गोष्टींची तपासणी करून घ्या.
7 / 7
७. पस्तिशीनंतर फुफ्फुसांचे कार्य कमी होऊ लागते. असा त्रास होऊ नये, म्हणून तिशीनंतरच प्राणायाम किंवा फफ्फुसांचे कार्य वाढविणारे इतर काही व्यायाम करायला विसरू नये. त्यामुळे तिशीनंतर जर थोडंसं चालल्यावर दम लागत असेल, तर प्राणायाम, व्यायाम याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWomenमहिलाExerciseव्यायामWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स