शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी लसूण खाणं टाळावं, बघा लसूण खायचाच असल्यास कसा- किती खावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 9:09 AM

1 / 8
लसूण आरोग्यासाठी गुणकारीच आहे, पण तरीही तब्येतीच्या काही तक्रारी असतील, तर मात्र कच्चा लसूण खाणं टाळलेलं बरं.
2 / 8
कोणत्या प्रकारचा त्रास असेल तर कच्चा लसूण खाणं टाळावं, याविषयीची माहिती lokmat_sakhi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
3 / 8
यामध्ये असं सांगितलं आहे की ज्या लोकांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो, अशा लोकांनी कच्चा लसूण खाणं टाळावं.
4 / 8
काही लोकांच्या घामाची खूपच जास्त दुर्गंधी येते. काही लोकांच्या तोंडाचाही कायम वास येतो. अशा लोकांनी लसूण खाऊ नये. कारण त्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं.
5 / 8
ज्यांची पचनशक्ती थोडी कमजोर आहे, अशा लोकांनीही कच्चा लसूण खाणं टाळावं. कारण लसूणामध्ये असणारा फ्रुक्टोज हा घटक तुमच्यासाठी आणखी त्रासदायक ठरू शकतो.
6 / 8
लसूण खाल्ल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते. जर तुम्ही रक्त पातळ होऊ नये म्हणून औषधोपचार घेत असाल तर लसूण खाणं टाळा.
7 / 8
रक्त पातळ होण्यास लसूण उपयुक्त ठरतो. म्हणून कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस लसूण खाणं टाळावं.
8 / 8
एका दिवशी १ ते २ पाकळ्या एवढ्याच प्रमाणात लसूण खावा. एखाद्या पदार्थामध्ये परतून किंवा शिजवून घातलेला लसूण खाणे अधिक चांगले.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स