1 / 11काही चित्रपट असे होते ज्यांनी फॅशनमध्ये नवीन ट्रेंड सेट केला. काही चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी नेसलेल्या साड्या फारच लोकप्रिय झाल्या. विविध ब्रॅण्डनी मग त्या पॅटर्नच्या साड्या बाजारात उतरवल्या. बाजारात त्या साड्यांना कमालीची मागणी होती. 2 / 11आता फक्त ९० ची थीम किंवा रेट्रो फॅशन करताना अशा साड्या आपण वापरतो. मात्र एकेकाळी या साड्यांचे ढीगच्या ढीग बाजारात विकले जात होते.3 / 11आजही कोण अशी साडी नेसून दिसले की ती साडी ज्या अभिनेत्रीमुळे गाजली तिचे नाव आपल्याला लगेच आठवते. पाहा तुमच्या कपाटातही कुठे अशा साड्या आहेत का?4 / 11मिस चांदनीची लाल साडी तर आजही लोकप्रिय आहे. सुष्मिता सेनने 'मै हू ना' चित्रपटामध्ये ही लाल साडी नेसली होती. त्यानंतर सिल्कच्या लाल साडीला मिस चांदनीची साडी असेच संबोधले जाऊ लागले. 5 / 11रेखाचा 'खुबसुरत' नावाचा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये तिने नेसलेल्या सगळ्याच साड्या फार लोकप्रिय झाल्या. साध्या कॉटनच्याच साड्या रेखाने नेसलेल्या, मात्र दिसायला अगदीच सुंदर.6 / 11आजकाल प्लेन नेटेड साडी फार वापरली जाते. मात्र या साडीची ट्रेंडसेटर श्रीदेवी होती असे म्हणायला हरकत नाही. 'काटे नही कटते' या गाण्यामध्ये तिने निळी प्लेन साडी नेसली होती. त्या साडीमुळे सुरू झालेला ट्रेंड आजही चालूच आहे. 7 / 11ऐश्वर्या राय व माधुरी दिक्षितने देवदास चित्रपटातील 'डोला रे'या गाण्यामध्ये पांढरी बंगाली साडी नेसली होती. त्यावर लाल रंगाचा वर्कचा ब्लाऊज होता. नंतर लाल व पांढरे हे बंगालमध्ये प्रसिद्ध असलेले कॉम्बिनेशन भारतभर लोकप्रिय झाले.8 / 11ब्रम्हचारी या चित्रपटातील मुमताजची केशरी साडी माहिती नाही असा नेमकाच कोणी असेल. अगदी चापूनचोपून नेसलेली ही साडी प्रचंड लोकप्रिय ठरली. नंतर अनेक अभिनेत्रींनी त्या साडीची फॅशन फॉलो केली.9 / 11'ये जवानी है दिवानी' या चित्रपटामध्ये दिपीकाने नेसलेली नीळी झगमगीत साडी तरुणींना फारच आवडली. स्लिव्हलेस ब्लाऊज आणि एकरंगी चमकदार सिल्कची साडी त्यानंतर मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध झाली.10 / 11२ स्टेट्स या चित्रपटातील आलिया भटच्या साडयांचे कलेक्शन तर कमालच होते. शेवटच्या सीनमध्ये आलियाने नेसलेली लाल साऊथ इंडियन साडी महिलांना इतकी आवडली की नंतर अनेक लग्न समारंभांसाठी तशीच साडी वापरली गेली. 11 / 11'हम आपके है कौन' हा चित्रपट तर गाजलाच मात्र त्या चित्रपटातील माधुरीच्या कपड्यांची चर्चा आजही होते. तिचे सगळेच कपडे सुंदर होते, मात्र 'दीदी तेरा देवर दिवाना' या गाण्यातील माधुरीची साडी कमालीची सुंदर होती.