Tips and Tricks to make soft appam : How to make perfect appam at home
विकतसारखं जाळीदार, मऊ अप्पम घरीच करा; 7 सोप्या ट्रिक्स-केरळस्टाईल परफेक्ट अप्पम बनेल By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 6:53 PM1 / 8 अप्पम हा लोकप्रिया साऊथ इंडियन पदार्थ आहे. नारळाची चटणी आणि सांभारबरोबर आवडीने अप्पम खाल्ले जाता. अप्पम हा पौष्टीक पदार्थ अनेकांच्या आहाराचा भाग असतो. अप्पम हा अप्पे आणि उत्तपमपेक्षा वेगळा पदार्थ आहे. तांदळाच्या पिठापासून हा पदार्थ तयार केला जातो. अप्पम पातळ, मुलायम आणि स्पाँजी पदार्थ आहे. चांदळाचे पीठ, नारळाचं दूध, नारळ आणि दूध मिसळून तयार केला जातो. 2 / 8१) अप्पम बनवण्यासाठी मुख्य सामग्री तांदूळ आहे. म्हणूनच चांगल्या तांदळाचा वापर करा. बॅटर बनवण्याआधी रात्रभर तांदूळ भिजवून ठेवा. 3 / 8२) जेव्हा तांदूळ व्यवस्थित भिजतील तेव्हा बॅटर स्मूथ आणि सॉफ्ट बनेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भिजवलेल्या तांदळाची आवशकता असेल. अप्पम नरम होण्यासाठी तांदूळ व्यवस्थित धुवून ७ ते ८ तासांसाठी भिजून ठेवा. 4 / 8३) अप्पम सॉफ्ट बनवण्यासाठी तुम्ही अप्पमचे बॅटर व्यवस्थित दळून घ्या. त्यात नारळाच्या पाण्याचा वापर करा. नारळाच्या पाण्याचा वापर तुम्ही दळताना करत असाल त्यात यीस्टचे प्रमाण कमी ठेवा.5 / 8४) भिजवलेले तांदूळ दळताना मेथी पावडर किंवा थोड्या शिजलेल्या तांदळाचा वापर करू शकता. तांदूळ आणि मेथीच्या वापराने अप्पम सॉफ्ट बनतात.6 / 8५) अप्पममध्ये बेकींग सोडा आणि एक ते दोन चमचे दूध घाला. दूधाच्या वापराने चांगला रंग येईल आणि अप्पम मऊ बनतील.7 / 8६) अप्पमचे पीठ तयार करताना कंसिस्टेंसीकडे विशेष लक्ष द्या. बॅटर जास्त घट्ट नसावं ना जास्त पातळ. डोसा बॅटरपेक्षा थोडं पातळ असावे.8 / 8७) अप्पम तुम्ही टोमॅटोची चटणी, नारळाची चटणी, सांबारबरोबर खाऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications