Tips To Buy Umbrella : How to Pick the Best Umbrella To Keep You Dry
Tips To Buy Umbrella : बाजारातून चांगली छत्री विकत घेण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरा; एकाच छत्रीवर निघेल पूर्ण पावसाळा By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 5:54 PM1 / 13पावसाळा (Monsoon) सुरू व्हायला अगदी बोटांवर मोजण्याइतकेच दिवस उरले आहेत. पावसाळा म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे छत्री. छत्रीशिवाय घराबाहेर पडलं की नेमका त्याच दिवशी जोरदार पाऊस पडतो असा अनुभव सगळ्यांनाच येतो. काहीवेळा छत्री असूनही तुम्ही पूर्णपणे भिजता. त्या छत्रीचा काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच या लेखात तुम्हाला छत्री विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सांगणार आहोत. (What Should I Consider When Buying an Umbrella) जेणेकरून पूर्ण पावसाळा ती छत्री खराब होणार नाही आणि व्यवस्थित वापरता येईल.2 / 13तुम्ही जी छत्री खरेदी कराल ती 10 किंवा 11 इंच लांबीची असेल हे पाहा, जेणेकरून तुम्हाला छत्री धरायला सोपं पडेल.3 / 13छत्रीचा आकार मोठा चांगला असावा जेणेकरून शरीराला संपूर्ण संरक्षण मिळेल.4 / 13छत्रीचे हँडल आरामदायक असावे आणि इतके गुळगुळीत नसावे की जास्त वेळ धरल्यास ते हातातून सटकेल.5 / 13काही लोकांना वाटते की छत्री महाग असेल तर ती चांगली असते. छत्री किमतीसह क्वालिटी बघायला विसरू नका.6 / 13छत्रीच्या दांड्याला गंज लागला असेल तर ती छत्री विकत घेऊ नका. अन्यथा काही दिवसांनी छत्री उघडायला आणि बंद करायला त्रास होऊ शकतो. 7 / 13तुम्हाला छत्री पकडायला अडचण वाटत असेल तर तुमच्या बॅगेत व्यवस्थित मावेल अशी फोल्डेबल छत्री विकत घ्या. छत्रीचे बटन्स लूज नाहीयेत याची खात्री करूनच छत्री विकत घ्या. 8 / 13तुम्हाला कलरफूल छत्र्या आवडत नसतील तर प्लेन छत्री घ्या. ३०० ते ६०० रूपयांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या छत्र्या उपलब्ध होतील.9 / 13दुकानातून छत्री घेण्याआधी उघडून पाहा. छत्रीचं कापड व्यवस्थित असल्याची खात्री करून मगच छत्री घ्या10 / 13आजकाल हार्टशेपच्या छत्र्याही बाजारात यायला सुरूवात झाली आहे.11 / 13ट्रांस्परंट छत्र्या ४०० ते ८०० रूपयांपर्यंत तुम्हाला बाजारात उपलब्ध होतील.12 / 13लहान मुलांसाठी छत्री विकत घेत असाल तर त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या छत्र्या तुम्हाला पाहायला मिळतील.13 / 13(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications