Tips To Wash Jeans Without Losing Color : How to Keep Jeans From Fading
नवीन जीन्सचा खूप रंग जातो? धुताना पाण्यात 1 वस्तू मिसळा, वर्षानुवर्ष रंग टिकेल, नवी दिसेल जीन्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 3:56 PM1 / 7महिला असो किंवा पुरूष जीन्स सर्वांनाच घालयला आवडते. इतर आऊटफिट्सच्या तुलनेत जीन्स महाग असते. पण2 ते 4 वेळा धुतल्यानंतर जिन्सचा रंग फिकट होऊ लागतो आणि लूक खराब होतो. (How to Keep Jeans From Fading)2 / 7काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही जिन्सची चमक नव्यासारखी करू शकता. जीन्सचा रंग निघू नये यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळ वर्षानुवर्ष तुम्ही वापरत असलेली जीन्स नव्यासारखी दिसेल. 3 / 7सगळ्यात आधी जीन्स धुताना काही चुका करणं टाळायला हवं. लोक जिन्सवर लागलेली घाण आणि मळ निघून जाण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात. 4 / 7गरम पाणी हे जिन्सचा रंग फेड होण्याचं मोठं कारण आहे. जीन्स थेट ऊन्हात सुकवू नका. जास्त ऊन लागल्यामुळे जिन्सचा रंग फेड होत जातो. 5 / 7जीन्स धुताना नेहमीच थंड पाण्याचा वापर करा. एक बादली थंड पाण्यात अर्धा कप व्हाईट व्हिनेगर घाला. त्यात धुतलेली जिन्सा १५ ते २० मिनिटांसाठी तशीच ठेवून द्या. 6 / 7नंतर जीन्स पाण्यातून बाहेर काढून त्यातलं पाणी काढून हँगर लटकवून ठेवा.असं केल्यानं रंगही उडणार नाही आणि जिन्सचे कापड सॉफ्ट राहील7 / 7इतर कपड्यांबरोबर जिन्स न भिजवता वेगळ्या बादलीत जिन्स भिजवा ज्यामुळे जास्त रंग लागणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications