Top 10 Most famous Indian Desserts and the legendary dessert places in India
भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 1:13 PM1 / 12आपण जसे पिझ्झा, नूडल्स, चॉकलेट्स असे परदेशी पदार्थ मोठ्या प्रेमाने खातो, तसंच आपल्याकडचे काही पदार्थही परदेशी लोक मोठ्या आवडीने खातात. आपल्याकडच्या गोड पदार्थांचा गोडवा चाखण्यासाठी तर जगभरातील कित्येक खवय्ये उत्सूक आहेत.2 / 12tasteatlas यांनी 100 most legendary dessert places in the world अशी एक खादी नुकतीच प्रसिद्ध केली असून त्यात १० भारतीय गोड पदार्थांचा समावेश आहे.3 / 12या यादीमध्ये सगळ्यात आधी म्हणजेच १८ व्या क्रमांकावर येणारा गोड पदार्थ आहे पुण्याच्या कयानी बेकरीचा मावा केक.4 / 12रसगुल्ला... बस्स नाम ही काफी है.. नुसतं नाव ऐकूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. या यादीत २५ व्या क्रमांकावर आहे कोलकत्याच्या के. सी. दास येथील रसगुल्ला.5 / 12रसगुल्ल्याच्या खालोखाल २६ वा नंबर पटकावला आहे कोलकत्याच्या रम बॉल्सनी. कोलकताला कधी गेलात तर हे दोन पदार्थ खायला विसरू नका.6 / 12यानंतर २९ व्या क्रमांकावर आहेत हैद्राबादच्या कराची बेकरीतील फ्रुट बिस्किट्स7 / 12कोलकत्याच्या गोड पदार्थांनी खरोखरच या यादीमध्ये बाजी मारली आहे. पुन्हा एकदा ३७ व्या क्रमांकावर बी ॲण्ड आर मुलीकची संदेश नावाची मिठाई आहे.8 / 12४९ व्या क्रमांकावर आहे मुंबई येथील के. रुस्तम यांचे आईस्क्रिम सॅण्डविच.9 / 12दिल्लीच्या कॅरेमल कुल्फीनेही या यादीमध्ये ६७ वे स्थान पटकावले आहे.10 / 12लखनौला कधी जाणं झालं तर तिथल्या प्रकाश कुल्फीमध्ये मिळणारा कुल्फी फालूदा खायला विसरू नका. या यादीमध्ये कुल्फी फालुदा ७७ व्या क्रमांकावर आहे.11 / 12चितळेंची बाकरवडी हा पुणेकरांसाठी अगदी मानाचा पदार्थ. बाकरवडी काही गोड नसते. पण या यादीमध्ये ८५ व्या क्रमांकावर बाकरवडीची वर्णी लागली आहे. 12 / 12नवी दिल्ली येथील जलेबीवाला येथे मिळणारी जिलेबी या यादीमध्ये ९३ व्या क्रमांकावर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications