top 5 flowering plants in India in winter season, gardening tips for winter
हिवाळ्यात भरभरून फुलणारी ५ रोपं; ऐन थंडीत रंगबिरंगी फुलांनी बहरून जातील तुमच्या बागेतल्या कुंड्या... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2024 12:24 PM1 / 6काही फुलझाडांच्या वाढीसाठी हिवाळा हा ऋतू अतिशय उत्तम आहे. त्यामुळे जर तुम्हाला फुलझाडांची खूप आवड असेल तर ही काही रोपं नक्की लावा. फेब्रुवारीपर्यंत त्यांचा बहर कायम राहातो.2 / 6त्यातलं सगळ्यात पहिलं फुलझाड आहे इझोरा. लाल, गुलाबी, केशरी अशा रंगाची फुलं अगदी गुच्छाने येतात. ते पाहूनच एकदम फ्रेश वाटतं.3 / 6लँटिना या रोपालाही हिवाळ्यात खूप सुंदर नाजूक फुलं येतात. लाल, गुलाबी, पांढरा, पिवळा, जांभळा या रंगाची नाजूक छोटीशी फुलं खूपच लक्षवेधी असतात.4 / 6झेंडूच्या रोपालाही या दिवसांत छान बहर येतो. एरवी कधी एवढा फुलून न येणारा झेंडू सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात मात्र भरभरून मिळताे. 5 / 6ॲस्टर या फुलझाडाच्या वाढीसाठीही हिवाळा अतिशय उत्तम आहे. पांढरी, गुलाबी, जांभळी ॲस्टरची फुलं सजावटीसाठी, देवपुजेसाठी वापरली जाऊ शकतात.6 / 6मिली या रोपाला फक्त हिवाळ्यातच बहर येतो. एरवी वर्षभर त्याला फारशी फुलं नसतात. मिलीसुद्धा केशरी, गुलाबी, पांढरा या रंगात मिळते. या फुलाला सुगंध नसतो. आणखी वाचा Subscribe to Notifications