Top 6 High Protein Veg foods : Top 6 High Protein veg foods for muscle growth
कोण म्हणतं प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो? 'हे' ६ व्हेज पदार्थ खा, हाडं-मसल्स होतील मजबूत By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 9:08 AM1 / 8ज्याचं वजन जास्त आहे किंवा शरीरावर अजिबात मांसच नाही अशा प्रत्येकासाठीच प्रोटीन गरजेचं असतं स्नायूंच्या विकासापासून, हाडांच्या मजबूतीसाठी प्रोटीन्स गरजेचे असतात. शरीरात प्रोटीन्सची कमतरता उद्भवल्यास वजन कमी होणं, मांसपेशी कमकुवत होणं, हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होणं अशी लक्षणं जाणवतात. (Top 6 High Protein veg foods for muscle growth) 2 / 8कमकुवतपणा, थकवा येणं, शरीरात सूज येणं, इम्यून सिस्टिम कमकुवत होणं, केस आणि नखांच्या समस्या उद्भवतात. फक्त मांसाहारातून भरपूर प्रोटीन मिळतं असा अनेकांचा समज असतो पण काही व्हेज पदार्थ नियमित खाल्ल्यास प्रोटीन्सची कमतरता दूर होऊ शकते.3 / 8डाळीत जवळपास २५ टक्के प्रोटीन असते. यात फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. इतर डाळींच्या तुलनेत मुगाच्या डाळीत सर्वाधिक प्रोटीन असते.4 / 8चिया सिड्स प्रोटीन्सचा एक चांगला स्त्रोत आहे यात १५ ते १७ टक्के प्रोटीन असते. हे एक हेल्दी फॅट्सयुक्त अन्न आहे.5 / 8भोपळ्याच्या बीया या प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. यात जवळपास ३० टक्के प्रोटीन्स असतात. याशिवाय हेल्दी फॅट, यात असतात. 6 / 8ग्रीक योगर्ट एक डेअरी उत्पादन आहे. यात दह्याच्या तुलनेत अधिक प्रोटीन्स असतात. साधारणपणे १० ते १५ ग्राम प्रोटीन्स असतात.7 / 8पनीरमध्ये भरभरून प्रोटीन्स असतात. १ कप पनीरमध्ये १२ ग्राम प्रोटीन असते. प्रोटिन्स व्यतिरिक्त कॅल्शियमचाही उत्तम सोर्स आहे.8 / 8ब्रोकोलीमध्ये अन्य भाज्यांच्या तुलनेत प्रोटीन्स जास्त असतात. ही भाजी प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. एक कप कच्च्या ब्रोक्रोलीमध्ये जवळपास २.६ ग्राम प्रोटीन्स असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications