शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरातली हवा कायम शुद्ध ठेवण्यासाठी ८ इन्डोर प्लान्टस; ऑक्सिजन मिळेल-आनंदी, निरोगी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 2:55 PM

1 / 7
दिवसेंदिवस प्रदूषण जास्त वाढत आहे. (Top Highest Oxygen Enriching Indoor Plants) घराच्या आजूबाजूचे वातावरण शुद्ध नसेल किंवा घरात ताजी हवा येत नसेल तर वेगवेगळे आजारही उद्भवू शकतात. (Oxygen Plants) बाहेरच्या प्रदूषणयुक्त हवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही घरात काही शुद्ध झाडं लावू शकता ज्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही आणि तुम्हालाही फ्रेश वाटेल. अशी कोणती झाडं आहेत जी भरपूर ऑक्सिजन देतात पाहूया. (Indoor Oxygen Plants)
2 / 7
प्रत्येक घरात तुळशीचं झाड असतं. तुळशीचं रोप घरात ठेवल्याने वातावरण चांगले राहते आणि ऑक्सिजनची कमतरता भरून निघण्यास मदत होते. कारण या झाडातून जवळपास २० तास ऑक्सिजन मिळतो.
3 / 7
बांबू प्लांट हवेतील टोल्यूनी दूर करते. हा पदार्थ हवेत पसरल्यास नाक, डोळे आणि घश्यावर चुकीचा परिणाम होतो. यातून बेंजिन, फॉर्मलडिहाइडसारखे विषारी पदार्थ बाहेर निघतात. घरात बांबू प्लांट ठेवल्यामुळे ऑक्सिजन लेव्हल वाढते.
4 / 7
एलोवेरा एक असं रोप आहे जे खासकरून छतावर लावले जाते. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी एलोवेराचे रोप घरात ठेवणं गरजेचं आहे.
5 / 7
ऑक्सिजनची कमतरता भासल्यासस घरात स्पाडर प्लांट लावा याला रिबन प्लांट असेही म्हटले जाते. यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधार होतो इतकंच नाही तर हॅप्पी वाईब्ज येतात. तुम्ही घरात किंवा लिविंग रूममध्ये हे झाड ठेवू शकता.
6 / 7
एरिका पाम हवेला शुद्ध ठेवते. ऑक्सिजनसाठी हा उत्तम पर्याय आहे. हे एक इंडोर प्लांट असून हवेतील हानीकारक गॅस शोषून घेतले जातात. कमी प्रकाश आणि कमी पाण्यात तुम्ही हे रोप उगवू शकता.
7 / 7
ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी पोथोस प्लांट घरात ठेवा. हे झाड कार्बन मोनोऑक्साईड, बेंजिन आणि फॉर्मलडिहाईड गाळून हवेतील गुवत्तेत सुधारणा करते. इतंकच नाही तर स्ट्रेसही मॅनेजमेंटही होते.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्स