Try these 6 methods to calm your mind in anxiety in 5 minutes you will feel relaxed
एकदम स्ट्रेस येतो, काही सुचत नाही ? पटकन करा ६ गोष्टी - व्हा रिलॅक्स आणि ब्लडप्रेशरही वाढणार नाही... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 7:27 PM1 / 7सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये ताण - तणाव, चिंता कमी - अधिक प्रमाणात सगळ्यांनाच असते. आपल्या डेली रुटीनमध्ये चिंता, स्ट्रेस, तणाव या खूपच सामान्य गोष्टी मानल्या जातात. परंतु काहीवेळा आपल्या मेंदू व मनावरील हा ताण इतका वाढतो की, आपले मानसिक संतुलन बिघडू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते तेव्हा काहीवेळा ती इतकी घाबरलेली असते की, त्याचे स्वतःच्या बोलण्या - वागण्यावर नियंत्रण राहत नाही. यालाच 'एन्झायटी अटॅक' असे म्हटले जाते. आपण स्ट्रेसमध्ये असताना खूप घाबरतो, काय करावे सुचत नाही. अशावेळी भीती आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी आपण काही सोप्या उपायांचा वापर करु शकतो. अशा काही सोप्या उपायांचा वापर करून आपण समोर असलेल्या समस्येला अगदी चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी तयार होऊ शकता(Try these 6 methods to calm your mind in anxiety in 5 minutes you will feel relaxed).2 / 7 आपण भीतीने घाबरलो असताना आपल्या श्वासाची लय तुटते. अशावेळी दिर्घ श्वास घेतल्याने मन शांत होते आणि शरीराला आराम मिळतो. ४ ते ६ सेकंद नाकाने श्वास घ्या, नंतर तोंडाने हळूहळू श्वास सोडा. काही मिनिटांसाठी ही प्रक्रिया पुन्हा करा. यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. 3 / 7आपण जिथे बसला आहात त्याच्या आजूबाजूच्या किमान ५ गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ :- माझ्या आजूबाजूला लॅपटॉप आहे. टेबलाजवळ खुर्ची आहे. टेबलावर छोटंसं रोपटं आहे त्याच्या शेजारी पाण्याचा ग्लास आहे. रस्त्यावरून गाड्यांचा आवाज येत आहे. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीकडे लक्ष दिल्याने तुमचे मन आणि मेंदू वर्तमानात परत येते आणि यामुले स्ट्रेस कमी होतो. 4 / 7जर तुम्हांला अधिकच भीती वाटत असेल किंवा तुम्ही घाबरलात असाल तर स्ट्रेचिंग करा. अशावेळी दोन्ही हातांच्या मुठी घट्ट आवळून मग पुन्हा सोडा. असे किमान ३ ते ४ वेळा करा. असे केल्याने तुमचा स्ट्रेस रिलीज केला जाऊ शकतो. तुमचे खांदे, मान, पाय जितके जमतील तितके स्ट्रेच करा असे केल्याने तुमच्या मनावरील आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत मिळते. 5 / 7अचानक वाढलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी देवाचे नाव घ्या. याचबरोबर तुम्ही तुमच्या आवडत्या मंत्रांचा जप देखील करु शकता. मन सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या मंत्राचा जप करू शकता. मंत्रांचा वारंवार उच्चार केल्याने मन शांत होते आणि अस्वस्थता कमी होते. यासोबतच डोळे बंद करून शांत बसून मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. 6 / 7थंड पाण्याचा स्पर्श मेंदूला तात्काळ अलर्ट करतो आणि तणाव कमी करतो. चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा किंवा थंड पाण्याची बाटली कपाळावर थोड्या वेळासाठी ठेवा. यामुळे टेंन्शन कमी होऊन तुम्हाला रिलॅक्स होण्यास मदत मिळू शकते. 7 / 7तुमचे मन शांत करण्यासाठी, सुंदर नैसर्गिक दृश्याचे चित्र किंवा तुमच्या आवडत्या क्षणाचे फोटोज पाहा. हे फोटो पाहून तुमच्या सकारात्मक आठवणी ताज्या होतील, ज्यामुळे तुमची चिंता कमी होते. यामुळे अशावेळी तुमच्या आयुष्यातील आनंदी किंवा सुखाचे खास प्रसंग आठवा. आणखी वाचा Subscribe to Notifications