शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केस गळतीमुळे कपाळ मोठं दिसतंय? अर्धा चमचा हळद या पद्धतीने केसांना लावा-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 8:39 AM

1 / 8
भारतीय पदार्थांमध्ये मसाले हे खूपच महत्वाचे मानले जातात. सगळ्यात जास्त स्वंयपाकात हळदीचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त कोणतंही अन्न अपूर्ण असते. यातील पोषक तत्वांमुळे शरीराला बरेच फायदे मिळतात
2 / 8
केसांना मजबूत बनवण्यापासून केसांची चांगली वाढ होण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी हळद महत्वाची मानली जाते. ज्यामुळे केस मजबूत राहतात. हळदीचा मास्क केसांना लावल्याने बरेच फायदे मिळतात.
3 / 8
हळदीची पावडर दही किंवा नारळाच्या तेलाबरोबर तुम्ही पेस्ट बनवू शकता. केस आणि स्काल्पवर लावा २० ते ३० मिनिटं लावलेलं राहू द्या त्यानंतर व्यवस्थित धुवा.
4 / 8
हळद पावडर मधात मिसळून मास्क तयार करा. केसांमध्ये चमक येते आणि केस कोमल राहतात. हे कपडे धुवून १५ ते २० मिनिटं तसंच राहू द्या.
5 / 8
हळद पावडर नारळाच्या किंवा बदामाच्या तेलात मिसळून हळदीच्या तेलाने स्काल्पची मसाज करा. डिप कंडिशनिंगसाठी रात्रभर सोडून द्या, ज्यामुळे केस चांगले राहतील.
6 / 8
हळद पावडर आणि एलोवेरा जेल मिसळून हा हेल्दी हेअर मास्क केसांना लावा. ज्यामुळे स्काल्पची समस्या उद्भवणार नाहीत.
7 / 8
यातील एंटी फंगल आणि जीवाणूरोधी गुण डँड्रफ आणि खाज येत असेल तर या समस्यांपासून आराम देतात.
8 / 8
हळदीच्या वापराने केस तुटणं कमी होतं, हळद पावडर मुख्य स्वरूपात रक्त परिसंचयण सुधारण्यास मदत होते आणि केस चांगले वाढतात
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजी