शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

त्वचेसाठी वापरा हा खास राईस मास्क.. मऊ-सुंदर-स्वच्छ त्वचा मिळवा महिनाभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2025 09:02 IST

1 / 8
तांदूळ हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे. जेवताना भात नसेल तर पोटाला संतुष्ट वाटत नाही. त्यामुळे भात जवळपास रोजच आपण खातो. पण भात फक्त खाण्यासाठीच नाही तर इतरही गोष्टींसाठी वापरता येतो.
2 / 8
केसांच्या वाढीसाठी तांदूळ अगदी फायदेशीर आहे. तांदळाच्या पाण्याने न्हायल्याने केस अगदी मजबूत तसेच घनदाट होतात. अनेक जण केसांसाठी तांदळाचा हेअरपॅक लावतात.
3 / 8
पण तुम्हाला माहिती आहे का? तांदूळ फक्त केसांसाठीच नाही तर त्वचेसाठीही कमालीचा फायदेशीर ठरतो. त्वचा अगदी सुंदर आणि मस्त होते.
4 / 8
उन्हाळ्यामध्ये त्वचा अगदी काळवंडून जाते. तसेच अनेक डागही त्वचेवर उठतात. मुरूम उठतात. उन्हामुळे त्वचा करपून निघते. दिसायला तर वाईट दिसतेच मात्र खाज तसेच रॅशही उठते.
5 / 8
त्वचेसाठी हा मास्क आठवड्यातून एकदा वापरा आणि मग पाहा त्वचा काय कमाल दिसेल. चेहऱ्यावर उन्हाचा सगळ्यात जास्त परिणाम होतो. तसेच थंडीतही चेहरा खराब होतो. कोणताही ऋतू असो हा मास्क चेहऱ्यासाठी फायद्याचाच ठरेल.
6 / 8
सध्या सगळीकडे तांदळाचा मास्क फार व्हायरल झाला आहे. हा मास्क घरीच तयार करता येतो. वापरायलाही अगदीच सोपा आहे. याला कोरियन स्किन केअर असेही नाव आहे.
7 / 8
तांदळामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. तसेच अनेक जीवनसत्वे असतात. प्रथिने असतात. पोषणतत्वे असतात. जे त्वचेसाठी फार फायद्याचे ठरतात. त्यामुळे हा मास्क कोणत्याही टाईपच्या त्वचेसाठी सुट होतो.
8 / 8
रात्रभर तांदूळ भिजत घाला. पाणी जास्त वापरू नका. तांदूळ बुडतील एवढेच पाणी वापरा. दुसर्‍या दिवशी तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्या. त्यामध्ये काहीही घालायची गरज नाही. फक्त तांदळाची पेस्ट चेहऱ्याला लावायची. सुकेपर्यंत ठेवायची. मग धुऊन टाकायची.
टॅग्स :Home remedyहोम रेमेडीBeauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स