शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवा उजळताना काढा स्पेशल वसूबारस सोपी रांगोळी; इतकी सुंदर की पाहात राहावे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 4:41 PM

1 / 10
दिवाळी म्हणजे फराळ (Faral), रोषणाई आणि बरंच काही (Diwali). मुख्य म्हणजे रांगोळीशिवाय हा सण अपूर्ण आहे. दिवाळीला हमखास दाराबाहेर रांगोळी काढली जाते. रांगोळीमुळे प्रसन्न वाटतं(Vasubaras Diwali : very easy and beautiful vasubaras rangoli).
2 / 10
आज वसुबारस. यंदा २८ तारखेला वसुबारस आली आहे. हिंदू धर्मात गोवत्स द्वादशीला विशेष महत्त्व असून गाईला पवित्र मानलं जातं.
3 / 10
दिवाळी हा सण वसुबारस या सणाने सुरु होते. या सणानिमित्त आपण दाराबाहेर किंवा अंगणात रांगोळी काढतोच.
4 / 10
वसुबारसनिमित्त आपणही दाराबाहेर सुंदर रांगोळी काढू शकता. ठिपक्यांची किंवा छापा काढण्यापेक्षा आपण याही पद्धतीने सुंदर रांगोळी काढू शकता.
5 / 10
गायीचे चित्र काढून, आपण त्याभोवतीने रांगोळी भरू शकता.
6 / 10
रांगोळीचे विविध रंग वापरून, आपण दार किंवा अंगणासमोर सुंदर अशी गाय वासराची रांगोळी काढू शकता.
7 / 10
जर आपल्याला गायीची रांगोळी काढायला जमत नसेल तर, आपण फक्त वसुबारस लिहून रांगोळी काढू शकता.
8 / 10
जर आपल्याला आकाराने मोठी रांगोळी काढायची असेल तर, गाय - वासरूची जोडी काढून, त्या भोवती फुलांची रांगोळी काढा.
9 / 10
आपण छाप्याचा वापर करूनही डिझाईन काढू शकता, आणि रांगोळीच्या मधोमध वसुबारस लिहू शकता.
10 / 10
रांगोळीचा रंग आणि तुमचा उत्साह हा घरातील प्रत्येकाचा चेहऱ्यावर आनंद घेऊन येईल हे नक्की. वसुबारसचीही सुंदर रांगोळी काढून, दिवाळी सण साजरा करा.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024rangoliरांगोळीSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल