1 / 9छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि समर्पण केवळ अद्भूत. त्यांच्यासोबतच नाव येतं त्यांची दूध आई धाराऊचं.2 / 9छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. शंभूराजे हे सईबाईंचे पुत्ररत्न. राजेंच्या जन्मादरम्यान सईबाईंची प्रकृती अगदीच खालवली होती. त्या नंतर खूप आजारी पडल्या.3 / 9नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी आईचे दूध म्हणजे अमृत. पण शंभूराज्यांना दूध पाजण्याएवढीही ताकद सईबाईंमध्ये नव्हती.4 / 9बाळाला दूध तर पाहिजे म्हणून जिजामातांनी काहीतरी पर्याय शोधायचे ठरवले. त्यांनी तातडीने धाराऊ गाडे यांना निरोप पाठवला.5 / 9पुरंदरच्या पायथ्याशी कापुरहोळ नावाचे एक गाव आहे. त्या गावात तुकोजी गाडे पाटील हे गृहस्थ राहत होते. त्यांची पत्नी म्हणजे धाराऊ गाडे पाटील ज्यांना आपण दूध आई म्हणून ओळखतो.6 / 9धाराऊंना जिजामातांनी सर्व परिस्थिती समजावून सांगितली. धाराऊंना त्यांनी शंभूराज्यांनाही दूध पाजा असे सांगितल्यावर, धाराऊंनी अत्यंत मायेने जिजाऊंचे म्हणणे मान्य केले.7 / 9नुकत्याच बाळंत झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजले तेवढ्याच आत्मीयतेने शंभूराज्यांनाही पाजले. सईबाईंच्या निधनानंतरही धाराऊंनी शंभूराज्यांचा सांभाळ केला.8 / 9छत्रपती शिवाजी महाराजांनी धाराऊंना दरवर्षी १६ होनांची तैनाती दिली. धाराऊंच्या मुलाला स्वराज्याच्या सेवेत सहभागी करून घेतले.9 / 9छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचे वंशज आजही कापूरहोळ गावातच राहतात. धाराऊ या शंभूराजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या. ( माहिती संदर्भ : https://www.youtube.com/shorts/SC0nlOa_SXE)