फ्रोझन करुन ठेवा आणि कधीही खा ‘या’ ६ भाज्या, आज भाजीला काय करु, प्रश्नही सुटेल! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 3:47 PM
1 / 7 भाज्या आणि फळं खराब होऊ नयेत तसेच दीर्घकाळ चांगली टिकून राहावी यासाठी आपण ती फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. याचबरोबर काही भाज्या अशा असतात की ज्या आपण फ्रोझन करून पुढचे बरेच दिवस वापरु शकतो. या भाज्या फ्रोझन अवस्थेत असल्यामुळे लगेच खराब होत नाहीत. पण बराचकाळ फ्रिजमध्ये फ्रोझन करून ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत किंवा असे पदार्थ खराब होण्याच्या आधी खाऊन संपवले पाहिजे असा नियम पाळला जातो. परंतु काही भाज्या या अशा असतात की त्या ताज्या स्वरूपात न ठेवता फ्रोझन अवस्थेत जास्त प्रमाणात पोषक द्रव्ये देतात. यामुळे अशा काही भाज्या या फ्रोझन अस्वस्थेत स्टोअर करून ठेवल्या असतानाच खाव्यात, या भाज्या नेमक्या कोणत्या ते पाहूयात(Vegetables You Should Always Buy Frozen Not Fresh). 2 / 7 शक्यतो मटार आपण फ्रोझन अवस्थेत असतानाच घेतो. मटारचे दाणे सोलल्यानंतर लगेच ते फ्रोजन करुन ठेवले नाहीत तर त्यातील नॅचरल साखरेचे स्टार्चमध्ये रुपांतर होऊन मटारची चव बिघडून ते नैसर्गिकरित्या गोड लागत नाही. मटार सोलल्यानंतर जर ते लगेच फ्रोझन करून ठेवले तर त्यांची चव आणि पोषणमूल्य दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. 3 / 7 मटार प्रमाणेच आपण फरसबी देखील फ्रोझन करून ठेवू शकतो. फरसबी जर वेळीच तोडून योग्य पद्धतीने फ्रिजमध्ये स्टोअर केली नाही तर ती सुकून जाते. सुकलेल्या फरसबी मधील पोषणमूल्यही कमी होते तसेच तिचा कुरकुरीतपणा देखील निघून जातो. जर आपण फरसबी फ्रोझन केली तर ती न सुकता दीर्घकाळ आहे तशीच कुरकुरीत राहते व त्यातील पोषणमूल्य देखील जपली जातात. फरसबी फ्रोझन केल्याने त्यांची शेल्फ लाईफ देखील वाढते. 4 / 7 ताज्या ब्रोकोलीपेक्षा फ्रोझन करून ठेवलेली ब्रोकोली अधिक चांगली असते. मटारप्रमाणेच, ताजी ब्रोकोली देखील कापल्यानंतर लगेचच स्वतःची पोषणमूल्य गमावते. फ्रोझन ब्रोकोलीमधील व्हिटॅमिन 'सी', फायबर आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतात. 5 / 7 फ्रोझन कॉर्न सॅलॅड, सूप, सँडविच, भात यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालून चविष्ट पदार्थ तयार केले जातात. मटारप्रमाणेच मक्याचे दाणे तोडल्यानंतर त्यातील नॅचरल साखरेचे स्टार्चमध्ये रुपांतर होते. परंतु जर हे मक्याचे दाणे फ्रोझन करून ठेवले तर त्याची चव आणि पोषणमूल्य त्यात कायम टिकून राहतात. 6 / 7 फ्रेश, ताज्या पालक पेक्षा फ्रोझन केलेला पालक खाणे फायदेशीर ठरते. ताज्या पालकाची पाने पटकन कोमेजून जातात आणि काही दिवसातच तो मलूल होऊन जातो, याउलट फ्रोझन पालकाची पाने त्यातील पोषक घटक आणि ताजेपणा अनेक महिने टिकवून ठेवतो. पालकाची पाने फ्रोझन केल्याने त्यांच्या पानांतील लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन 'सी' टिकवून ठेवण्यास अधिक मदत होते. यासोबतच जर पालकाच्या पानांचा रंग बराच काळ आहे तसाच टिकवून ठेवण्यासाठी तो फ्रोझन करणे गरजेचे आहे. 7 / 7 गाजर काही काळाने स्वतःचा ओलावा गमवून राबरासारखे होतात. याउलट गाजर फ्रोझन करून स्टोअर केल्यास त्याचा रंग, चव आणि त्यातील व्हिटॅमिन 'ए' आणि बीटा-कॅरोटीन सारखे पोषक घटक दीर्घकाळ टिकवून ठेवले जातात. गाजर एकदाच सोलून व कापून स्टोअर करून ठेवले तर प्रत्येकवेळी आपल्याला ते कापत बसण्याची गरजच भासणार नाही. आणखी वाचा