शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विराट- अनुष्का ते रणबीर- आलिया! बघा प्रत्येक लग्नात किती सुबक होती वरमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 5:55 PM

1 / 8
१. कोणत्याही लग्न सोहळ्याची साक्षीदार असते नवरदेव- नवरीच्या गळ्यातली वरमाला.... लग्नकार्यात (wedding) सोन्याच्या मंगळसुत्राला (mangalsutra) जेवढे महत्त्व, तेवढेच महत्त्व असते या फुलांच्या हारांना.. म्हणूनच तर अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर (celebrity's wedding) त्यांच्या वरमाला हा देखील एक चर्चेचा विषय ठरत असतो.
2 / 8
२. सध्या रणबीर- आलिया या जोडीची वरमालाही अशीच गाजते आहे. हिरव्या आणि पांढऱ्या फुलांचा वापर करून गुंफण्यात आलेले हार खूपच सुंदर होते.
3 / 8
३. असेच काहीसे हार काही महिन्यांपुर्वीच कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नातही पाहायला मिळाले. कतरिनाच्या लाल लेहेंग्यावर नाजुक फुलांचे पांढरेशुभ्र हार खूपच खास दिसत होते.
4 / 8
४. चार महिन्यांपुर्वीच मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचंही लग्न झालं.. त्यांच्या लग्नातले लाल फुलांचे हारही अतिशय लक्षवेधी होते. गुलाबाच्या पाकळ्यांपासून ते हार तयार करण्यात आले होते.
5 / 8
५. अंकिताच्या लग्नात दिसले तसेच हार प्रियांका जोप्रा आणि निक यांच्या गळ्यातही दिसले होते.. लाल फुलांच्या हारामध्ये मधूनच दिसणारे इवलेसे पांढरे फुल खूपच नजाकतीने गुंफण्यात आले होते.
6 / 8
६. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे असंच एक गाजलेलं लग्न. या लग्नासाठी पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या गुलाबाचा वापर करून हार गुंफण्यात आले होते. वरमालेसाठी अख्ख्या गुलाब फुलांचा करण्यात आलेला वापर छानसा दिसत होता.
7 / 8
७. अशाच पद्धतीचे हार गळ्यात घातले होते सोनम कपूर आणि तिचा नवरा आनंद अहुजा यांनी.. त्यांच्यासाठी अर्धवट उमललेल्या गुलाबी रंगाच्या गुलाब कळ्यांपासून हार बनविण्यात आले हाेते.
8 / 8
८. रणवीर कपूर आणि दिपिका पदुकोन यांच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेले हे लाल रंगाच्या मोठ्या फुलांचे हारही अतिशय सुरेख होते. हे सगळे फोटो पाहून जाणवतं की कपडे, दागदागिने यांचा ट्रेण्ड जसा दरवर्षी बदलत जातो, तसंच काहीसं लग्नातील हारांच्या ट्रेण्डचंही आहे..
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्नFlowerफुलंRanbir Alia Weddingरणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ