Want a natural makeup look like Sanya Malhotra? Just 8 things, minimal makeup-chunky complexion
सान्या मल्होत्रासारखा नॅचरल मेकअप लूक हवा? फक्त 8 गोष्टी,मिनीमल मेकअप-ठसठशीत रंगरूप By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 3:31 PM1 / 8सान्या मल्होत्रा स्वत:ला ड्रिमर म्हणते. स्वप्न पाहाणारी, स्वप्न जगणारी स्त्री असा ती स्वत:चा उल्लेख करते. तिला इतर कोणापेक्षाही स्वत:ची कंपनी खूप आवडते. स्वत:सोबत, स्वत:च्या कुटुंबासोबत असताना आपण सर्वात जास्त आनंदी असतो असं ती म्हणते. सान्या मल्होत्रा म्हणते आनंदासाठी सेरोटेनिन हे हार्मोन महत्त्वाचं. आपण जेव्हा आपल्या आवडीचं काम करतो, आपल्या आवडीचं काम पूर्ण मन लावून करतो तेव्हा आपल्या शरीरात सेरोटेनिन हे हार्मोन स्त्रवत आणि आपण आनंदी असतो असं सान्या काम आणि आनंदाचं सोपं समीकरण सांगते.2 / 8आपण छान दिसतो यामागचं प्रमुख कारण म्हणजे मी माझ्यासोबत जास्त वेळ घालावते. स्वत:ला वेळ देते. स्वत:सोबत राहिल्याने, स्वत:कडे लक्ष दिल्याने, स्वत:साठी वेळ दिल्याने आपल्यात उत्साह निर्माण होतो. नव्यानेच आपण आपल्याला सापडतो असं सान्या सांगते.3 / 8सेटवर , कॅमेऱ्यासमोर काम करताना स्किन ही फ्लाॅलेसचं दिसायला हवी. पण रोजच्या जगण्यात ती फ्लाॅलेस दिसायला हवी हा माझा आग्रह नसतो असं सान्या म्हणते. त्वचेचला श्वास घेण्याची गरज असते. जेव्हा चेहेऱ्यावर मेकअपचे थर नसतात तेव्हा त्वचा मुक्तपणे श्वास घेऊ शकते. त्वचेला मोकळेपणानं श्वास घेता आला की चेहरा खुलतोच. चांगल्या त्वचेसाठी मेकअप नाही तर संतुलित आहार+ आहारात द्रवपदार्थ असणं+ पुरेसं पाणी पिणं या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आवश्यकता भासल्यास त्वचेसाठी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्वचा निरोगी आणि सुदृढ राहाण्यासाठी सान्या माॅश्चरायर आणि सनस्क्रीन या दोन गोष्टींना सान्या जास्त महत्त्व देते.4 / 8सान्या मल्होत्रा 'मी टाइम'मध्ये एक तास व्यायामाला देते. त्या वेळेत ती फंक्शनल ट्रेनिंग/ किंवा क्राॅस फिट वर्कआउट तर आठव्ड्यातून एक दोन वेळा बाॅक्सिंगचा सरावही करते. आनंदी जगण्यासाठी व्यायाम हा आपल्या ऊर्जा पुरवत असल्याचं सान्या म्हणते. व्यायामामुळे शरीराला आणि स्वत:च्या मनाला शिस्त लागते. ब्यूटीसाठी फिटनेस महत्त्वाचा आहे असं सांगणारी सान्या वेळेत काम सुरु करते. वेळेत काम संपवते. रात्री आठनंतर काम नाही, फोनही बाजूला. रात्री आठनंतरचा वेळ स्वत:साठी,स्वत:च्या कुटुबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी देणाऱ्या सान्याला म्हणूनच कामाचा कितीही लोड असला तरी त्याचं दडपण वाटत नाही,5 / 8सान्याचा लूक विशेष दिसतो तो तिच्या खास मेकअप स्टाईलमुळे. मेकअप करताना लिपस्टिक आणि आय मेकअपला सान्या विशेष महत्त्व देते. याबद्दलच्या तिच्या आवडी निवडी म्हणजे इतरांसाठी मेकअपच्या खास टिप्स ठरतात.6 / 8सिम्पल ऑफिस लूक, मीटिंगसाठीच्या साध्या लूकसाठी काजळ, मस्कारा आणि लाइड शेड लिपस्टिक लावावी असं सान्या सांगते.7 / 8सान्या ड्रेस डार्क आणि फॅशनेबल असेल तर त्याला साजेसा मेकअप करताना बोल्ड आय मेकअप करण्याचा सल्ला देते. सान्याच्या मते बोल्ड ड्रेसला मॅच होणारा लूक बोल्ड आयमेकअपमुळे मिळतो.8 / 8बोल्ड लूक हवा असल्यास सान्या रेड शेड लिपस्टिक लावण्याला महत्त्व देते. ब्लश हा स्किन टोननुसार असला तर मेकअप उठून दिसतो असं सांगत सान्या मेकअप झाल्यावर हायलायटर वापरल्यास मेकअप उठून दिसतो असं सांगते. आणखी वाचा Subscribe to Notifications