Want a perfect figure like Disha Patni? Check out her amazing work out routine
दिशा पटनीसारखी परफेक्ट फिगर हवी? पाहा तिचे जबरदस्त वर्क आऊट रुटिन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2023 2:26 PM1 / 8बॉलिवूडची बार्बी डॉल दिशा पटनीने अल्पावधीतच आपल्या क्युटनेसच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिचा प्रत्येक लूक हा घायाळ करणारा ठरतो. तिच्या फ्लॉलेस स्किनवर मुलं नाहीतर मुली देखील फिदा आहेत. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप परिश्रम घेते. 2 / 8दिशा आपल्या वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. तिचा वर्कआउट रुटीन प्रचंड टाईट असतो. ती आपल्या शरीरावर खूप मेहनत घेते. ती दररोज जिममध्ये जाऊन अनेक तास वर्कआउट करून घाम गाळते. 3 / 8आपल्याला देखील दिशासारखी परफेक्ट बॉडी शेप हवी असल्यास, तिच्या वर्कआउट रुटीनला आपण फॉलो करू शकता.4 / 8दिशा स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करते. ती डान्स, किक बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, वेट ट्रेनिंग देखील करते. बिझी शेड्युलमधून देखील ती स्वतःला वेळ देते.5 / 8दिशा इंस्टाग्रामवर व्यायाम करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. त्यात ती मिलिटरी प्रेस, शोल्डर प्रेस, चेस्ट प्रेस, बायसेप कर्ल असे अनेक व्यायाम करताना दिसून येते. 6 / 8आपली फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी दिशा दिवसभर भरपूर पाणी पिते. यासह जंक फूडला तिने कायमचे बाय - बाय केलं आहे. ती योग्य आहार आणि व्यायामाला अधिक प्राधान्य देते.7 / 8दिशा आपल्या अॅब्ससाठी प्रसिद्ध आहे. तिचे अॅब्स वर्कआउट करत असतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतात.8 / 8वर्कआउट करण्यापूर्वी दिशा इंटेन्स वार्मअप करते. आपल्याला देखील दिशासारखी फिगर हवी असल्यास तिच्या रुटीनला आपण फॉलो करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications