Want a simple - stylish - professional look? See and follow the style of 6 actresses
सिंपल - स्टायलिश - प्रोफेशनल लूक हवा? ६ अभिनेत्रींची स्टाइल पाहा, करा फॉलो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2022 10:05 PM1 / 8बऱ्याचदा वर्कप्लेसमध्ये जाताना काय परिधान करावे काही सुचत नाही. अनेकदा आपण ट्रेण्डी लूक परिधान करण्याचा प्रयत्न करतो पण तसं होताना दिसून येत नाही. आपल्याला प्रोफेशनलसह स्टायलिश लूक हवा असेल तर या बॉलिवूड अभिनेत्रींचे लूक फॉलो करा. मिळेल सिंपल, हटके आणि ट्रेण्डी लूक. 2 / 8बॉलिवूडमधील बेबो अर्थात करिना कपूरने जांभळ्या रंगाचा कट पँट-सूट स्टाईल केला आहे. आपण यावर क्रॉप टॉप देखील परिधान करू शकता.3 / 8अभिनेत्री कतरीना कैफ स्टायलिश आयकॉन म्हणून ओळखली जाते. यात तिने पट्टेरी कोट-पँट परिधान केला आहे. जो अतिशय स्टायलिश लूक देत आहे. आपण आपल्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन निवडू शकता.4 / 8रकुल प्रीत सिंगने परिधान केलेला बॉसी लूक तुम्हाला स्टायलिश लूक देईल. जर आपल्याला लाल रंग आवडत असेल तर तुम्ही हा लुक ट्राय करू शकता.5 / 8रोमँटिक पिंक कलरच्या कोट-पँटमधला तमन्नाचा हा लूक अगदी साधा, सिंपल दिसत आहे. यावर तुम्ही लाईट मेकअप करून स्टायलिश लूक मिळवू शकता.6 / 8कतरिनाप्रमाणेच दीपिका पदुकोणनेही स्ट्रीप कोट-पँट लूक परिधान केला आहे. आपल्या आवडीप्रमाणे रंगामध्ये बदल आणू शकता.7 / 8चेक्स ब्लेजरमध्ये धाकड गर्ल कंगना रणावत अतिशय सुंदर स्टायलिश दिसत आहे. आपण हा बॉसी लूक परिधान करू शकता.8 / 8लेमन येलो कलरमध्ये क्यूट गर्ल आलिया भट्ट सिंपल आणि स्टायलिश दिसत आहे. यात तिचा नो मेकअप लूक आणखी उठून दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications