शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Wedding Special: हळदीच्या कार्यक्रमासाठी बघा ५ परफेक्ट लूक... दिसाल सुंदर आणि स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2022 6:30 PM

1 / 7
१. सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. लग्नसराईमधला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे नवरा- नवरीची हळद. आजकाल हा समारंभही अगदी एखाद्या इव्हेंटप्रमाणेच धूमधडाक्यात साजरा होतो.
2 / 7
२. त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमासाठीही नवरी आणि तिच्या जवळच्या सगळ्याच स्त्रिया अगदी खास तयार होतात. यासाठी आधीपासूनच पिवळ्या ड्रेसची तयारी केली जाते. आता तुम्हीही अशीच तयारी करत असाल आणि नेमकं कसं ड्रेसिंग करावं, दागिने कोणते घालावेत हे लक्षात येत नसेल, तर बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही एक से एक हलदी लूक एकदा बघाच. नवरी असाल तरीही किंवा करवली असाल तरीही तुम्ही अशा पद्धतीचं ड्रेसिंग करून हळदीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
3 / 7
३. अभिनेत्री सोनम कपूरचा हा हलदी लूक सोशल मिडियावर सध्या गाजतो आहे. दोन- तीन दिवसांपुर्वीच तिने दिल्लीमध्ये एका विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तिथल्या हळदीच्या कार्यक्रमासाठी तिने अशा पद्धतीचं ड्रेसिंग केलं होतं.
4 / 7
४. मॉडेल मॉनी रॉय हिची स्टाईलची, कपड्यांच्या चॉईसची नेहमीच चर्चा होत असते. तिचा विवाहही काही महिन्यांपुर्वीच झाला. त्यावेळी तिने अशा पद्धतीचं स्टायलिश पण तेवढाच ट्रॅडिशनल टच असणारं ड्रेसिंग केलं होतं.
5 / 7
५. अभिनेत्री करिश्मा कपूरचा हा अनारकली ड्रेस, हेअरस्टाईल आणि दागदागिन्यांचं सिलेक्शन या गोष्टीही तिच्या चाहत्यांना खूपच आवडल्या होत्या. रणबीर कपूर- आलिया भटच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी तिने अशा पद्धतीचं ड्रेसिंग केलं होतं.
6 / 7
६. आलिया भटचा हा एक सिंपल पण तेवढाच सुंदर हलदी लूक. असा एखादा पिवळ्या रंगाचा गाऊन आणि त्यावर सिंपल मेकअप असं केलं तरी चारचौघांत तुम्ही नक्कीच उठून दिसाल.
7 / 7
७. नेहा कक्करचा हा साडीतला हलदी लूकही एकदम खास आहे. साडी लव्हर असाल तर अशा पद्धतीचं ड्रेसिंग करू शकता. ट्रॅडिशनल आणि स्टायलिश असं ते मिक्स कॉम्बिनेशन होऊ शकतं.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशनmarriageलग्न