शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजचा रंग निळा : घ्या यादी - सांगा यापैकी किती पदार्थ तुम्ही खाल्ले आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 8:30 AM

1 / 8
नवरात्रीत नऊ रंगांना खूप महत्त्व आहे. या नऊ दिवसात विविध रंगाचे पोशाख परिधान करून महिलाच नसून, पुरुष यासह बच्चे कंपनीही मिरवतात. पण या साजशृंगारासोबत आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. आपण नऊ दिवस त्या-त्या रंगाचे पदार्थ खाऊन फिट राहू शकता(What are the health Benefits of Blue colour food, check out list).
2 / 8
आज चौथी माळ. सर्वत्र निळेमय वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. यासोबत ताटाला देखील पौष्टीक पदार्थांनी निळेमय करायला काही हरकत नाही. आज आपण असे ६ पदार्थ पाहणार आहोत, जे दिसायला रंगाने निळे असतील पण, आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.
3 / 8
गडद निळ्या रंगाची ब्ल्यू बेरी आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यात विशिष्ट फ्लॅव्होनॉइड रेणू असतात, जे डीएनए नुकसान आणि मेंदूच्या पेशींमध्ये होणाऱ्या हानीचा वेग कमी करतात. याशिवाय वजन कमी करण्यासही मदत करतात. आपण आपल्या आहारात ब्ल्यू बेरी ज्यूसचा समावेश करू शकता.
4 / 8
जांभूळ खाण्याचे अनेक जबरदस्त फायदे आहेत. जांभळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन ए यासारखी पोषक तत्व असतात. जांभूळ नेहमी जेवणानंतर खा, ज्यामुळे जेवण व्यवस्थित पचेल.
5 / 8
आरोग्यासाठी वांगी एकदम बेस्ट मानली जाते. वांगी हे पोषक तत्वांचे पॉवर हाऊस आहे, त्यात कॅलरीज खूप कमी आढळतात, तसेच ते व्हिटॅमिन्स, फायबर, मॅग्नेशियम, नियासिन आणि मॅग्नेशियमने परिपूर्ण असतात. त्यामुळे आहारात वांग्याचा समावेश कराच.
6 / 8
पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी फुलून येणारा वेल म्हणजे गोकर्ण. गोकर्णाची फुलं आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. आपण या फुलांचा वापर करून चहा, काढा किंवा ताकात मिक्स करून पिऊ शकता.
7 / 8
तपकिरी आणि काळ्या मनुक्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज इत्यादी पोषक तत्वे आढळतात. रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्याने आरोग्याच्या निगिडत अनेक समस्या सुटतात. त्वचा, केस, यासह पोटाच्या विकारासाठी मनुके फायदेशीर ठरतात.
8 / 8
ब्लॅक करंट आईस्क्रीम आपण खाल्लीच असेल. पण याचे आपल्याला फायदे ठाऊक आहेत का? ब्लॅक करंटमध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असतं. त्यात अँटिऑक्सिडंटही आढळते. याचा वापर औषधी कारणांसाठीही केला जातो. आपण ब्लॅक करंटचा वापर करून ज्यूस, आयस्क्रीम यासह विविध पदार्थ तयार करू शकता.
टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Fasting & Foodनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.