शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सीटचा भाग खूपच वाढला? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगतेय व्यायाम, बेढब शरीराला येईल आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2024 9:10 AM

1 / 8
बैठ्या कामामुळे सीटचा मागचा भाग खूपच वाढतो, अशी तक्रार अनेकींची असते. अगदी ८- १० तास सलग एका जागी बसून काम करावं लागतं. शिवाय खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, याचा परिणामही होतोच
2 / 8
त्यामुळे मागचा माग म्हणजेच नितंबाचा भाग जास्त वाढतो आणि ते बेढब दिसू लागतात.तो भाग कमी करून शरीर पुन्हा शेपमध्ये आणण्यासाठी कोणते व्यायाम करावे, याविषयी आलिया भट, करिना कपूर यांच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी दिलेला हा खास उपाय पाहा..
3 / 8
यामध्ये त्यांनी काही व्यायाम करायला सांगितले आहेत. हे व्यायाम नियमितपणे केले तर नक्कीच सीट कमी होऊन बेढब शरीराला पुन्हा छान आकार येऊ शकतो. सुरुवातीला हे आसनं काही सेकंदासाठी करा. त्यानंतर वेळ वाढवत नेऊन साधारण २ ते ३ मिनिटांसाठी करा.
4 / 8
यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिलं आसन जे सांगितलं आहे ते म्हणजे कालियासन. यामुळे मांड्या, पोटऱ्या या भागातली चरबी कमी होण्यासाठीही फायदा होतो.
5 / 8
दुसरं आहे व्याघ्रासन. हे आसन थोडं अवघड आहे. त्यामुळे हळू हळू करा. एकदम पुर्ण आसनस्थिती कदाचित येणार नाही. पण प्रयत्न केल्यास नक्कीच जमेल.
6 / 8
तिसरं आहे उर्ध्वमुख श्वानासन. यामुळे हातांच्या स्नायूंना बळकटी येण्यास मदत होते. तसेच पाठीच्या कण्याचाही चांगला व्यायाम होतो.
7 / 8
चौथे आहे अंजनेयासन. यामुळे पाठ, कंबर, पाय या भागाचा व्यायाम होतो, तसेच कंबरेच्या भागातील हाडांना मजबुती येते.
8 / 8
पाचवे आसन आहे सेतूबंधासन. ही ५ आसनं काही दिवस नियमितपणे करून पाहा. नितंबावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सExerciseव्यायामYogaयोगासने प्रकार व फायदे