तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 16:13 IST
1 / 10प्रत्येक घरात भात खाल्ला जातो आणि बऱ्याच लोकांना रात्रीच्या जेवणात भात खायला आवडतो. मात्र रात्री भात खाणं तुमच्या आरोग्यसाठी फारसं चांगलं नसल्याचं आता समोर आलं आहे. 2 / 10भात तुम्हाला एनर्जी आणि पोषक तत्वं मिळतात पण रात्रीच्या जेवणात तो खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच रात्री जेवताना भात का खाऊ नये हे जाणून घेऊया....3 / 10भातामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जे शरीराला एनर्जी देतात. रात्री शारीरिक हालचाली कमी असताना कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने कॅलरीज फॅट म्हणून साठवल्या जाऊ शकतात.4 / 10झोपेच्या वेळी शरीरातील मेटाबॉलिज्म मंदावतं, ज्यामुळे भातामधून मिळाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज बर्न करणं कठीण होतं, ज्याने कालांतराने वजन वाढू शकतं.5 / 10पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, म्हणजेच तो ब्लड शुगर लेव्हल लवकर वाढते. यामुळे टाइप २ डायबेटीस आणि मेटाबॉलिज्म समस्यांचा धोका वाढू शकतो.6 / 10रात्री भात खाल्ल्यानंतर अनेकांना पोट फुगणे आणि पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. 7 / 10भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे पचनक्रिया मंदावू शकतात, रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्याने एसिडिटी, गॅस होऊ शकतो, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो.8 / 10रात्री नियमितपणे भात खाल्ल्याने पोटावरचे फॅट्स जास्त वाढू शकतात आणि नंतर वजनही वाढतं.9 / 10पांढरा तांदूळ हा एक रिफाइंड कार्बोहायड्रेट आहे ज्यामध्ये फायबरचा अभाव असतो आणि त्याचे जास्त सेवन केल्याने पोटाभोवती फॅट्स स्टोरेज वाढू लागतं.10 / 10भातामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो एसिड असतं जे तुम्हाला रिलॅक्स करण्यास मदत करतं परंतु रात्री भात खाल्ल्याने तुम्हाला सकाळी ताजेतवानं वाटत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो.