What is Tube Blouse how to style it
ट्यूब ब्लाऊजचा नवा स्टायलिश ट्रेण्ड, साडीला द्या खास लूक - दिसा पारंपरिक आणि मॉर्डनही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2024 7:58 PM1 / 9आजकाल फॅशनमध्ये बरेच ट्रेण्ड पाहायला मिळतात. कधी जुने ट्रेण्ड मार्केटमध्ये नव्याने चर्चेत येतात. तर, कधी नवे फॅशन मार्केटमध्ये धुमाकूळ घालतात. असाच एक फॅशनचा ट्रेण्ड मार्केटमध्ये प्रचंड गाजत आहे (Fashion Tips). तो म्हणजे ट्यूब ब्लाउज. बाजारात विविध प्रकारचे साड्या आणि ब्लाउज मिळतात (Tube Blouse). मोठ्या, लहान स्लिव्जलेस ब्लाउज आपण घालतोच. पण बऱ्याच कमी महिलांनी ट्यूब ब्लाउज घालून पाहिलं असेल(What is Tube Blouse how to style it).2 / 9ट्यूब ब्लाउज दिसायला फार आकर्षक दिसतात. पण काही महिला त्यात अनकंफर्टेबल होतात. दरम्यान, ट्यूब ब्लाउज म्हणजे काय? त्यात अनकंफर्टेबल होऊ नये म्हणून काय करावे? त्यात प्रकार किती? पाहूयात. 3 / 9एथनिकसह ग्लॅमरस लूक हवा असेल तर, आपण साडीवर ट्यूब ब्लाउज घालू शकतो. बऱ्याच अभिनेत्री सिंपल साड्यांवर ट्यूब ब्लाउज परिधान करतात. पण ट्यूब ब्लाउज परिधान करताना ते निसटत नाही का? अभिनेत्री त्यात अनकंफर्टेबल होत नसतील का? असा प्रश्न साहजिक तुमच्याही मनात उद्भवत असेल?4 / 9ट्यूब ब्लाउजमुळे आपल्याला एक हॉट लूक मिळतो. त्याची रचना अशी आहे की ती सहजपणे शरीरावर टिकते आणि घसरत नाही. जर आपण देखील ट्यूब ब्लाउज घालण्याचा विचार करत असाल तर, बिनधास्त घाला. 5 / 9जर आपण ट्यूब ब्लाउज आपल्या मापानुसार टेलरकडे शिलाईसाठी देत असाल तर, फिटिंगमध्ये शिवायला सांगा. जर लूज शिवले तर, आपल्याला अनकंफर्टेबल वाटू शकते. जर टाईट शिवले तर, टाईट बसू शकते. ज्यामुळे शरीरावर निशान उठू शकतात.6 / 9बऱ्याच महिलांना असा प्रश्न उद्भवतो, ट्यूब ब्लाउज शरीरावर टिकून कसे राहते? खरंतर, ट्यूब ब्लाउजमध्ये एक विशेष वायर असते. त्या वायरच्या सहाय्याने कप जोडले जातात. त्यानुसार कापड शिवले जाते. शिवाय वायरची गुणवत्ता देखील अधिक प्रमाणात चांगली असते, ज्यामुळे त्वचेला हानी पोहचत नाही.7 / 9ट्यूब ब्लाउजमध्ये अनेक प्रकार आहेत. आपण सिंगल शोल्डर ट्यूब ब्लाउज डिझाईन तयार करू शकता. या ब्लाउजची डिझाईन फार आकर्षक दिसतात. शिवाय नेकलाइन हायलाइट करण्यासाठी, आपण केसांचा बन किंवा स्लीक बॅक ओपन हेअरस्टाइल तयार करू शकता. 8 / 9ऑफ शोल्डर डिझाइन सध्या ट्रेण्डमध्ये आहे. आपल्याला फुल स्लीव्हज घालायला आवडत असेल तर, आपण अशा प्रकारचे ब्लाउज निवडू शकता. शिवाय फुल स्लीव्हज दिसायला फार आकर्षक दिसतात.9 / 9हॉल्टर नेक डिझाईनचा ब्लाउज, त्यात असलेल्या कटमुळे स्टायलिश दिसते. जर आपल्याला बॅकलेस घालायला आवडत असेल तर, या प्रकारची डिझाईन एकदा ट्राय करून पाहाच. आणखी वाचा Subscribe to Notifications