शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

B12, D3 सप्लिमेंट्स योग्य वेळी घेतल्या तरच फायदेशीर ठरतील- बघा कोणती औषधी कधी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2024 9:16 AM

1 / 5
व्हिटॅमिन बी१२, डी ३ सप्लिमेंट्स घेत असाल तर कोणती औषधी कधी घ्यावी ते पाहून घ्या.. कारण योग्य वेळी घेतल्या गेली तरच तिचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.
2 / 5
B12, D3 तसेच लोह या सप्लिमेंट्स घेण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती याविषयीची माहिती डॉक्टरांनी docpriyankasehrawat या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
3 / 5
यामध्ये त्या सांगतात की व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड हे सगळे वॉटर सॉल्यूबल आहेत. त्यामुळे तुमचं पोट जेव्हा खूप भरलेलं नसतं, अशावेळी ते घेणं जास्त फायदेशीर ठरतं. त्यामुळे या सप्लिमेंट्स शक्यतो नाश्त्याच्या १ तास आधी किंवा १ तास नंतर घ्याव्या.
4 / 5
व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, ओमेगा ३ हे फॅट सोल्यूबल आहेत. त्यामुळे या सप्लिमेंट्स अशाच वेळी घ्या, जेव्हा तुम्ही पोटभर जेवले असाल. जर तुम्ही व्हिटॅमिन डी पावडर स्वरुपात घेत असाल तर ते दुधासोबतच घ्या. कारण व्हिटॅमिन डी ला कॅल्शियमची जोड मिळाली तरच ते शरीरात योग्यप्रकारे मिसळले जातात.
5 / 5
तुम्ही जर लोह सप्लिमेंट्स घेत असाल तर ते शक्यतो नाश्त्यानंतर १ तासाने घ्यावं. शिवाय त्याच्यासोबत व्हिटॅमिन सी देणारे काहीतरी अन्नपदार्थ खावे किंवा प्यावे. जर आयर्न सप्लिमेंट्स घेऊन ॲसिडीटी होत असेल तर जेवणानंतर नाश्त्यानंतर लगेचच त्या घ्या.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmedicineऔषधं