शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बॅकलेस ब्लाऊजच्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार कोणती ब्रा घालावी ? निवडा योग्य ब्रा - दिसा स्टायलिश आणि कॉन्फिडंट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 16:32 IST

1 / 11
अनेकजणींना साडीवर बॅकलेस पॅटर्नचा ब्लाऊज घालायला (What to wear with a backless blouse ) आवडते. जर साडी नेसून तुम्हाला बोल्ड आणि क्लासी लूक हवा असेल तर बॅकलेस पॅटर्नचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. परंतु बॅकलेस पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये नेमकी कोणत्या पद्धतीची ब्रेसियर घालावी, असा प्रश्न पडतो.
2 / 11
बॅकलेस पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये योग्य पद्धतीची ब्रेसियर (which bra is best for backless blouse) निवडता येत नसल्याने अनेक महिला बॅकलेस ब्लाऊज घालणे टाळतात. योग्य आकार आणि डिझाइनची ब्रेसियर फक्त तुमचे पोश्चर सुधारण्यास मदत करत नाही तर सोबतच, ब्लाऊजची फिटिंग देखील व्यवस्थित दिसण्यास मदत करतात.
3 / 11
इतकेच नाही तर काहीवेळा चुकीची ब्रेसियर घातल्याने ती बॅकलेस ब्लाऊज मधून दिसू शकते. अशावेळी तुमच्या बॅकलेस ब्लाऊजच्या पॅटर्ननुसार त्यात नेमकी कोणत्या पद्धतीची ब्रेसियर घालावी ते पाहूयात.
4 / 11
जर तुम्ही डोरी किंवा हॉल्टर नेकलाइन ब्लाऊज घालणार असाल, तर सीमलेस कन्व्हर्टेड ब्रा किंवा बॅकलेस अंडरवायर स्ट्रॅपलेस ब्रा निवडा. यामुळे तुमच्या ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसेल तसेच ब्लाऊज मधून ब्रा दिसणार देखील नाही.
5 / 11
जर तुम्हाला साडीसोबत पातळ बॅक स्ट्रॅप असलेला ब्लाऊज घालायचा असेल तर सिलिकॉन अ‍ॅडेसिव्ह ब्रा हा सर्वोत्तम पर्याय आहे. सिलिकॉन अ‍ॅडेसिव्ह ब्रा कोणत्याही आधाराशिवाय किंवा पट्ट्याशिवाय शरीराला चिकटवता येते किंवा पारदर्शक पट्टा देखील वापरता येतो.
6 / 11
ट्यूब टॉप स्टाईल ब्लाऊजमध्ये स्टिक-ऑन कप्स ब्रा घालणे योग्य ठरेल. ही ब्रा डीप नेक आणि स्ट्रिंग ब्लाऊजसोबत सहजपणे घालता येते आणि ती पूर्णपणे अदृश्य राहते.
7 / 11
जर तुम्ही फ्रंट प्लंजिंग नेकलाइन असलेला ब्लाउज घातला असेल, तर इझी टू वेअर पेस्टी घालणे योग्य राहील. हे तुमच्या त्वचेला चांगले चिकटतात आणि कोणत्याही प्रकारच्या ब्रा लाईन्स अगदी सहजपणे लपवतात.
8 / 11
तुमच्या बॅकलेस ब्लाऊजच्या पॅटर्ननुसार नेहमी योग्य आकाराची तसेच योग्य फिटिंगची ब्रेसियर घाला. खूप लहान किंवा खूप मोठ्या आकाराची ब्रेसियर घातल्याने ब्लाऊजचे फिटिंग खराब दिसू शकते किंवा ब्रेसियर ब्लाऊजमधून दिसू शकते.
9 / 11
बॅकलेस पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये ब्रेसियर घालताना नेहमी ब्लाऊजच्या रंगाशी जुळणारी ब्रा निवडा, जेणेकरून ती दिसणार नाही.
10 / 11
बॅकलेस ब्लाऊजमध्ये जुनी किंवा ब्राचे पट्टे सैल असलेली ब्रा घालणे टाळावे.
11 / 11
जर तुम्ही बॅकलेस ब्लाऊजमध्ये योग्य प्रकारची ब्रा निवडली तर तुम्हाला अशा पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये स्टायलिश आणि कॉन्फिडंट वाटेल. यामुळे तुम्ही बॅकलेस ब्लाऊज अधिक चांगल्या पद्धतीने कॅरी करु शकता.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्स