Who is 'Phool' AKA Nitanshi Goel From Laapataa Ladies?
१६ वर्षांची 'लापता लेडीज' मधली अभिनेत्री बनली 'स्टार', सोशल मीडियात १० मिलियन फॉलोअर्स, 'ती' नक्की कोण? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2024 10:00 AM1 / 9सध्या सोशल मिडीयावर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Amir Khan) 'लापता लेडीज' (Laapata Ladies) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. शिवाय चित्रपटातील मुद्दा हा प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन किरण राव यांनी केलं असून, या सिनेमातील पात्रांचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. ज्यात १६ वर्षीय तरुणी नितांशी गोयल हिचाही सामावेश आहे. तिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून, तिची चर्चा इंटरनेटवर होत आहे(Who is 'Phool' AKA Nitanshi Goel From Laapataa Ladies?).2 / 9नितांशी नक्की आहे तरी कोण? तिला १६ व्या वर्षी आमीर खानच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली? असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. 3 / 9नितांशी गोयल ही उत्तर प्रदेशच्या नॉएडामध्ये राहते. तिचा जन्म १२ जून २००७ साली झाला. तिने आपलं शालेय शिक्षण नोएडाच्या खेतान शाळेत पूर्ण केलं. तिला कमी वयात प्रसिद्धी मिळाली. मुख्य म्हणजे तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. 4 / 9तिने नुकतंच आमिर खानसोबत आपल्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली. किरण राव दिग्दर्शित हा सिनेमा २ वधुंवर आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर मोठा पदर असल्याने त्या ट्रेनमध्ये बदली होतात, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. यातील एका वधुचा रोल नितांशी गोयलने साकारला आहे. 5 / 9'लापता लेडीज' या चित्रपटाआधी तिने, २०१६ साली 'मन मै हे विश्वास' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी ती अवघ्या ९ वर्षांची होती. त्यामध्ये तिने साकारलेली शबरीची भूमिका प्रेक्षकांना भावली, आणि तिने साकारलेलं पात्र लोकांच्या लक्षात राहिलं.6 / 9याव्यतिरिक्त तिने नागार्जून एक योद्धा, थपकी प्यार की, पेशवा बाजीराव, कर्मफल दाता शनी अशा चर्चेत असलेल्या मालिकांमध्ये काम केलं. मालिकांव्यतरिक्त तिने 'इनसाइट एज-२' या वेबसिरिजमध्येही दमदार भूमिका साकारली.7 / 9मालिका, वेबसिरीज आणि चित्रपटाव्यतिरिक्त तिने फॅशन आयकॉनचा देखील किताब पटकावला आहे. २०१५ साली, पँटलून ज्युनिअर फॅशन आयकॉनची ती मानकरी ठरली. तर, २०१६ साली इंडिया किड्स फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. तिला नृत्याची देखील आवड आहे. तिने अनेक डान्स स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 8 / 9नितांशीला अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याची खरी प्रेरणा आपल्या आईकडून मिळाली. एका मुलाखतीत ती म्हणाली, 'माझ्याकडून मला प्रत्येक गोष्ट करण्याची प्रेरणा आईकडून मिळते. माझ्या आईने मला प्रत्येक पावलावर मदत केली. अभिनय करता-करता मी शिक्षणही घेत आहे. कारण शिक्षण खूप महत्वाचे असल्याचे आई सांगते. अभिनयात क्षेत्रात येण्याचा निर्णय माझा होता. हा निर्णय घेताना माझ्या आईने पाठींबा दिला.'9 / 9नितांशी सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर १० मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मिडियाबाबत विचारले असता, ती म्हणाली, 'मी नेहमी माझ्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आज माझे इन्स्टाग्रामवर १० मिलियन फॉलोअर्स आहेत. माझ्यासारख्या सामान्य मुलीसाठी ही खूप मोठी बाब आहे. मी माझे चाहते, शुभचिंतकांचे यासाठी आभार मानते.' आणखी वाचा Subscribe to Notifications