शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लोखंडी तव्यावर पोळी भाजताना जळते? ४ चुका टाळा- पोळ्या करपणार नाही- छान फुलतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2024 9:13 AM

1 / 8
दुपारचं जेवण असो किंवा मग रात्रीचं जेवण असतो. दोन्ही जेवणात बहुतांश वेळा पोळी किंवा चपाती असतेच. चपाती किंवा पोळी हा आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे.
2 / 8
काही जणींच्या हातच्या पोळ्या अगदी मऊसूत असतात. जळाल्याचा किंवा करपून पोळी काळी झाल्याचा अगदी लहानसा डागही त्यांच्या पोळ्यांवर नसतो.
3 / 8
त्याउलट मात्र काही जणींच्या बाबतीत असं होतं की लोखंडी तव्यावर पोळी किंवा चपाती भाजताना ती बऱ्याचदा जळते. पोळीवर बरेच काळसर डाग पडलेले दिसतात. अशी ठिकठिकाणी करपून काळी झालेली पोळी मग खावीशी वाटत नाही.
4 / 8
तुमच्याही बाबतीत असं होत असेल आणि पोळ्या करपत असतील तर या काही गोष्टी चुकत तर नाही ना, हे एकदा तपासून पाहा...
5 / 8
पोळी भाजण्याचा तवा हा नेहमी जाड बुडाचा असावा. खूप पातळ तवा असेल तर तो लवकर तापतो आणि मग त्यावरची पोळी लवकर जळते. त्यामुळे तुमचा तवा एकदा तपासून पाहा.
6 / 8
पोळ्या नेहमी मध्यम आचेवर भाजाव्या. तुम्ही पोळ्या भाजण्यासाठी गॅस खूप मोठा करत असाल तर पोळ्या किंवा चपात्या जळतील.
7 / 8
तवा जर व्यवस्थित घासलेला नसेल, तरीही पोळ्या जळतात. त्यामुळे भांडी घासण्याचा दगड वापरून लोखंडी तवा एकदा चांगला घासून घ्या.. त्यावरचे सगळे डाग काढून टाका.
8 / 8
तव्याला तेल लावून पोळ्या भाजत असाल आणि त्यावेळी गॅस खूप मोठा ठेवत असाल तर अशावेळीही पोळी पटकन जळू शकते. त्यामुळे सहसा पोळ्या भाजताना तव्याला तेल लावू नये.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.