Without Makeup look : Bollywood these actresses expended a lot money on her beauty
फक्त सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो खर्च करतात 'या' अभिनेत्री; पाहा विदाऊट मेकअप लूक By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 6:40 PM1 / 7बॉलीवुड अभिनेत्रींसाठी सुंदर दिसणं खूप महत्वाचं असतं. स्वतःला मेंटेन ठेवण्यासह वाढत्या वयात सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक अभिनेत्री स्वतःवर खूप खर्च करतात. क्वचित एखाद्यावेळी विदाऊट मेकअप असलेल्या सेलिब्रिटी तुम्ही पाहिल्या असतील. ९० च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवलं. त्यांच्या सौंदर्यानं सगळ्यांनाच भुरळ पाडली. 2 / 7मोठ्या पडद्यावर या अभिनेत्रींचा सुंदर आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांनाही वेड लागले. आपल्या अदांनी वेड लावणाऱ्या या तारकांच्या सौंदर्यामागे मेकअपचा मोठा वाटा असतो. आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींचे फोटो दाखवणार आहोत ज्या पडद्यावर आकर्षक दिसतात आणि विदाऊट मेकअप त्यांचा लूक खूप वेगळा दिसतो. अनेकजण त्यांना मेकअपशिवाय ओळखूही शकणार नाहीत. 3 / 7दिल है के मानता नही, सडक यांसारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री पुजा भट्ट खऱ्या आयुष्यात अनेकदा विदाऊट मेकअप दिसून आली आहे. मोठ्या पडद्यावर सुंदर दिसण्यासाठी पूजा सुरूवातीपासूनच महागड्या प्रोडक्टसचा वापर करत आली आहे. मेकअपशिवाय पूजा भट्टला तुम्ही ओळखूही शकणार नाही. 4 / 7बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपला फॅशन सेन्स आणि नो मेकअप लूकमुळे बरीच चर्चेत असते. सोनम डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स घालवण्यसाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करते. व्हायरल झालेल्या एका फोटोत सोनम आपल्या डोळ्यांखाली कन्सिलर लावताना दिसून येत आहे. 5 / 7धक धक गर्ल माधुरीच्या दीक्षितच्या कलेचे सगळेच चाहते आहेत. आपल्या कामासह सौंदर्यासाठीही माधुरी ओळखली जाते. माधुरी जेव्हा पहिल्यांदा सिने जगतात आली तेव्हा तिच्या त्वचेवर बरेच डाग दिसून येत होते. हे डाग लपवण्यासाठी माधुरीला महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागत होता. 6 / 7बॉलिवूडमध्ये दीपिका पदकोण आपलं काम आणि मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. दीपिका स्वतःला सुंदर बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करते. सोशल मीडियावर दीपिकाचे जुने फोटो पाहून अनेकजण हैराण होतात. कारण तेव्हाचे मेकअपशिवायचे फोटो आणि आताचे फोटो यात बराच फरक आहे.7 / 7प्रियांका चोप्रानं फिल्म इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी बरीच मेहनत केली. मोठ्या पडद्यावर उठून दिसण्याासाठी प्रियांकानं आपल्या नाकासह, ओठांची सर्जरी केली आहे. प्रियांका आपल्या अनेक स्किन ट्रिटमेंट्स विदेशात करते. सोशल मीडियावर अनेकदा प्रियांका वापरत असलेले घरगुती उपायही व्हायरल होत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications