शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Womens day 2022 : जग बदलेल तेव्हा बदलेल, तुम्ही स्वतः करा रोजच्या जगण्यात १० छोटे बदल! बदलून जाईल आयुष्य....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 2:05 PM

1 / 12
१. महिलांनी कोणतीही भीती न बाळगता मुक्तपणे जगावं.. त्यांच्या स्वप्नांना, इच्छा, आकांक्षाना नवं बळ मिळावं... म्हणून खरं तर महिला दिन साजरा केला जातो.. मग '८ मार्च' या फक्त एका दिवसाच्या चौकटीत हा दिवस बंदिस्त का करायचा?
2 / 12
२. महिला दिन आला की मग महिलांच्या कर्तृत्वाचे, त्यांच्या महानतेचे गोडवे गायले जातात.. त्यांचे थाटात सत्कार सोहळे केले जातात.. पण हा सगळा सोहळा एक दिवसासाठीच का? फक्त एकाच दिवशी महिलांचं कौतूक का? रोजच तिला तिचे हक्क, तिची स्पेस मिळाली तर...
3 / 12
३. इतरांकडून अपेक्षा करणं खूप झालं.. आता आपली स्पेस मिळविण्यासाठी आपणच थोडा प्रयत्न करूया.. थाेडं स्वत:लाही बदलवूया, म्हणजे मग आपलं कुटूंब, आपल्या भोवतीची माणसंही थोडी बदलू लागतील.. म्हणूनच तर जमेल तसे, झेपतील तसे हे छोटे- छोटे बदल रोजच्या जगण्यात करून बघा.. तुम्ही तर बदलून जालच, पण भोवतालचं जगही बदलतंय असं वाटेल..
4 / 12
४. बदलायचं म्हणजे खूप काही वेगळं करायचं असं मुळीच नाही.. पण आजपासून ठरवून टाका की स्वत:साठी नक्की थोडा वेळ काढणार.. सगळ्यांचं सगळं करताच ना तुम्ही? मग आता स्वत:साठी हे एक पाऊल उचला..
5 / 12
५. स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या.. म्हणूनच अगदी आतापासूनच एखादी जीम किंवा योगा क्लास शोधा आणि लगेच तिने ॲडमिशन घेऊन टाका.. इतरांच्या तब्येतीकडे लक्ष देताना थोडं स्वत:लाही जपूया..
6 / 12
६. कुणाला गाणं म्हणायला खूप आवडायचं तर कुणाला कथ्थक करायला.. पण मोठ्या झालो आणि हे सगळं मागेच पडलं ना.. म्हणूनच तर आता तुमच्या डेली रुटीनमधून थोडा वेळ काढा आणि तुमच्या आवडीच्या क्लासला ॲडमिशन घ्या.. वेळेचं टेन्शन अजिबात नको.. तुम्ही एकदा ॲडमिशन घ्या तर, वेळ आपोआपच मॅनेज होईल..
7 / 12
७. सगळ्यांचं झाल्यावर उरलेलं खायचं, किंवा सगळ्यांच्या शेवटी एकट्याने जेवायला बसून जे काही राहिलंय ते खायचं, ही सवय सोडून द्या. सगळ्यांसोबत नाश्ता करायला, जेवायला बसा..
8 / 12
८. वर्किंग वुमन असाल तर निश्चितच तुमचा रुटीन टाईमटेबल ठरलेला असतो.. त्यात क्वचितच बदल होतो. पण गृहिणींचं तसं नसतं. त्यांना दिवसातले २४ तास गृहितच धरलं जातं.. असं तुम्हाला गृहित धरलं जाण्याचं कारण एकच की तुम्हाला तुमचं फिक्स रुटीन नाही. त्यामुळे तुमचं एक फिक्स रुटीन सगळ्यात आधी तयार करा आणि त्यानुसार वागा. म्हणजे मग घरातल्या इतर मंडळींनाही तशी सवय लागेल..
9 / 12
९. घरातली सगळी कामं स्वत:च करून सुपर वुमन होण्याचा हट्ट सोडा.. नवऱ्याला, मुलांना काही घरातली कामं शिकवा आणि ती कामं त्यांच्याकडूनच करुन घ्या.
10 / 12
१०. नवऱ्याची म्हणजेच सासरकडची नाती सांभाळताच तुम्ही.. अगदी त्यांच्या मित्रांचा गोतावळाही जपता.. आता थोडा वेळ तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी- तुमच्या नातलगांसाठीही काढून ठेवा.
11 / 12
११. सगळ्यात महत्त्वाचंं स्वत:चं दुखणं खुपणं अंगावर काढण्याची सवय सोडून द्या.. आजारी असल्यावरही जमेल तशी घरातली कामं रेटून नेणं सोडा. तुम्ही तुमची तब्येत बरी होईपर्यंत एक- दोन दिवस आराम केला तर कुणाचं काहीही बिघडणार नाही.
12 / 12
१२. 'नाही' म्हणायला शिका.. मनातली भीती थोडी दूर करा.. झेपत नसताना, जमत नसताना केवळ 'नाही कसं म्हणणार....' या भीतीपोटी अंगावर कामाचा डोंगर ओढवून घेऊ नका.. घरातली आणि ऑफिसमध्येही जे पटत नाही, जे झेपत नाही त्याला स्पष्ट 'नाही' म्हणा.
टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी